मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी केले अभिवादन
शिवशाही न्यूज, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ असलेल्या नायगाव येथे स्मारक आहे. तेथे सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सभापती राम शिंदे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, मंत्री अतुल सावे,बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिहराजे भोसले, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार मनोज घोरपडे, आमदार अतुल भोसले, मदन भोसले भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, नितीन भरगुडे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित शिल्पसृष्टीची उभी करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांनी केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाच्या बाबतीत केलेले कार्य खूप मोठे आहे. त्यांचे जीवन चरित्र समाजाला कायम प्रेरणा देत राहील असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. उपस्थित सर्वच मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा