maharashtra day, workers day, shivshahi news,

वाई बस स्थानकासमोर एका कार ने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांना दिली धडक

एक जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

Killed on the spot in the accident, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई प्रतिनिधी शुभम कोदे

वाई बस स्थानकासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार  तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वर कडून वाई कडे येणाऱ्या गाडी क्रमांक (एम एच ०४ जीई ६६९५) या गाडीने रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या पादचाऱ्यांना धडक दिली.

या अपघातात राजेंद्र बजरंग मोहिते ( सोळशी, ता कोरेगाव) यांचा जागी मृत्यू झाला. अक्षय नामदेव कदम व अविनाश केळगणे (वारोशी, ता महाबळेश्वर) सिताराम धायगुडे (वाई) व शिवांश जालिंदर शिंगटे(राऊतवाडी ता कोरेगाव)हा  साडेतीन वर्षांचा) हे गंभीर जखमी झाले. जखमीना वाई व सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. हे सर्वजण वाई बाजारामधून आपली कामे उरकून आपापल्या घरी चाललेले असताना सायंकाळी साडेचार च्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघाताने बस  स्थानक  परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक व आजूबाजूच्या व्यापाऱ्यांनी भरधाव वाहन अडवून चालकाला चोप दिला. गाडीतील  तीन जण पळून गेले. हसन जिन्नससाहेब बोरवी (कोरची ता हातकणंगले,कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अशी माहिती परिक्षाविधीन पोलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्याम पानेगावकर यांनी दिली. उपनिरीक्षक बिपिन चव्हाण तपास करत आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !