maharashtra day, workers day, shivshahi news,

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कवठेकर प्रशालेत सप्तरंग कार्यक्रमाचे आयोजन

शोभायात्रा ठरली पंढरपूरकरांच्या कौतुकाचा विषय

Various programs at Kavthekar prashala, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर 

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या पंढरपूर कवठेकर प्रशालेमध्ये  दिनांक 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सप्तरंग या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचा पहिले पुष्प भव्यदिव्य अशा शोभा यात्रेने गुंफले.जवळपास सतराशे विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस विविध वेशभूषा विविध वाद्य व ऐतिहासिक पौराणिक व क्रांतिकारकांच्या वेशभूषा व देखावे यामधून समस्त पंढरपूरकरांना दर्शन देऊन चकित केले. 

शोभा यात्रेची सुरुवात टिळक स्मारकच्या भव्य  मैदानावरून पंढरपूर नगर परिषदेचे प्रशासनाधिकारी श्री सुनील वाळुंजकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली.यावेळेस क्रीडा अधिकारी श्री यादव, पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नाना मालक कवठेकर मानदसचिव श्री सु. र. पटवर्धन, सदस्य श्री मिलिंद जोशी,श्री शांताराम कुलकर्णी द.ह कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. एम.कुलकर्णी,जेष्ठ क्रीडाशिक्षक श्री प्रशांत मोरे, माजी क्रीडा शिक्षक श्री जी एस पवार ,श्री चव्हाण व  पालकवर्ग आवर्जून यावेळी उपस्थित होते या शोभा यात्रेची सुरुवात ते शेवट जवळपास पाऊण किलोमीटरचा होता यामध्ये उंट ,घोडे,रथ व ट्रॅक्टर मधून विविध वेशभूषा करणारे 400 विद्यार्थी यांचा समावेश होता.ढोल- ताशा,हलगी- लेझीम,टाळ- मृदुंग यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचा लक्षणीय सहभाग होता. अनेक ठिकाणी पंढरपूरकारांनी स्वयंस्फूर्तीने या शोभायात्रेला आवर्जून हजेरी लावून  रांगोळ्या व पुष्पवृष्टी करून  स्वागत केले करण्यात आले. 

अनेक ठिकाणी पालकांनी शोभयात्रेतील विद्यार्थ्यांना पाण्याची सोय करून आपला सहभाग नोंदविला पंढरपुरात दर्शनासाठी भाविक या शोभायात्रेला पाहण्यात इतके दंग होते की त्यांनी रथयात्रेमधील श्री विठ्ठल-रखुमाई,श्रीराम- सीतामाई लक्ष्मण व हनुमान यांना कृतार्थतेने नमस्कार केला.ढोल ताशाच्या आवेशपूर्ण नादात सहभागी विद्यार्थी आनंदाने बेभान होऊन व पारंपारिक भक्तीरचना विठ्ठलाची आळवणी करताना वारकऱ्यांच्या वेशभूषा मधील विद्यार्थी भजनामध्ये रममाण झालेले दिसत होते डॉक्टर वकील त्याचबरोबर ज्युडो-कराटेआणि जवान यांचे स्वतंत्र गट पालकांचे व पंढरपूरकरांचे लक्ष वेधून घेत होते. धनिक्षेपकावरून लावलेली भजन व समर्पक अशा पद्धतीचे पद्धतीचे माहितीप्रद निवेदन यामुळे आजची ही शोभायात्रा ही ऐतिहासिक नव्हे तर कायम समस्त पंढरपूरकरांच्या नव्हे तर विठुरायाच्या भाविकांच्या हृदयामध्ये कायमचे स्थान मिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली.ही शोभायात्रा यशस्वी करण्यामध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक श्री व्ही.वाय. पाटील ,उपमुख्याध्यापक श्री एम. आर. मुंडे, पर्यवेक्षिका सौ विश्वासे आणि प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षकेतर आणि पोलीस प्रशासन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !