maharashtra day, workers day, shivshahi news,

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व कराड शहर पोलिसानी २ पिस्टल ३ जिवंत काडतुसासह तिघांना अटक

पोलीसांनी 260000 रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत

Three arrested with pistol and cartridge, karad, police, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे) 

कराड शहर पोलिसांनी व गुन्हे शाखा सातारा यांनी पिस्टल विक्रीसाठी आलेल्या टोळीकडून 2 पिस्टल व तीन जिवंत काडतूसे असा 260000 रु.किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, डॉ.वैशाली कडुकर, अमोल ठाकुर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग यांचे मार्गदर्नाखाली सातारा जिल्ह्यामध्ये  बेकायदा बिगरपरवाना स्वतःचे जवळ पिस्टल बाळगणारे व बेकायदेशीर पिस्टलची विक्री करणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याचा सुचना पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्यानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार यांना दिलेल्या आहेत. त्या अनुषगाने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे स्थानिक गुन्हे शाखा सातारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, यांच्या मार्गदर्शनाखराली संयुक्त पथक तयार करुन त्यांना अवैध शस्त्राबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

मंगळवार दि.२८ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार कराड शहर पोलीस स्टेशन यांना त्यांचे विश्वसनीय खबऱ्या मार्फत माहिती प्राप्त झाली की, इसम आकाश चव्हाण वय २७ हा कार्वे नाका ते गोळश्चर जाणारे रोडवर बेकायदेशीर विनापरवाना पिस्तूल व त्यास लागणारी काडतुसे विक्री करणेसाठी थांबुन आहे. त्याप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे स्थागुशा सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर कराड शहर पोलीस स्टेशन, यांचे संयुक्त पथक तयार करुन त्यांना मिळाले बातमीप्रमाणे सुचना देवून त्यांना नमुद इसमास ताब्यात घेउन आक्षेपार्य  काही मिळून आल्यास कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

त्याप्रमाणे नमुद पथकाने कार्वे नाका ते गोळेश्वर परिसरात मिळाले बातमीप्रमाणे सापळा लावून बातमीमधील इसमास व त्याचे सोबत असलेले तेजस गुरव वय २४ जय कणसे वय २० या दोन इसमांना ताब्यात  घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याचेकडे 2,60,000/- किंमतीचे त्यामध्ये दोन पिस्टल व तीन जीवंत काडतुसे मिळुन आली ती हस्तगत करुन त्यांचे विरुध्द कराड शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासुन आजपर्यत एकूण १११ देशी बनवटीचे पिस्टल  ४ बाराबोर बदुक २ रायफल, २६० जीवंत काडतूसे , २८९ रिकामी काडतस, ५ रिकामे मँगझीन जप्त  करण्यात आलेली आहेत

समीर शेख (पोलीस अधीक्षक), डॉ .वैशाली कडुकर (अप्पर पोलीस अधीक्षक सातारा), अमोल ठाकुर, (उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पोलीस निरीक्षक राजु ताशिलदार कराड शहर पोलीस स्टेशन, सपोनि दत्तात्रय दराडे, सपोनि रोहित फार्णे स्थानिक गुन्हे शाखा  सातारा, सपोनि अशोक भापकर, कराड शहर पोलीस स्टेशन, पोउनि विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर स्थागुशा सातारा, कृष्णा डिसले, कराड शहर पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के , लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित सपकाळ, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, गणेश कापरे, ओंकार यादव, विशाल पवार, पृ्ीराज जाधव,सचिन ससाणे, रविराज वर्णेकर , शिवाजी गुरव तसेच कराड शहर पोलीस स्टेशनकडील विजय मुळे, अनिल स्वामी,दिग्विजय सांडगे, अमोल देशमुखर,संग्राम पाटील. आनंदा जाधव सोनाली पिसाळ यांनी कारवाई केली या कारवाई मधील सर्व अधिकारी व अमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉँ.वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !