maharashtra day, workers day, shivshahi news,

केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटींचा निधी मंजूर केला.

अहिल्या पुलास समांतर नवीन पूल होणार :आ. समाधान आवताडे

mla smadhan,autade,central minnister nitin gadkari, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

पंढरपूर आणि टेम्भूर्णी मार्गावर भीमा नदीवर आणखी एक पूल होणार असून येथील अहिल्या पुलास समांतर अशा नवीन पुलासाठी केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. या पुलासाठी आ. आवताडे यांनी ना. गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. 

पंढरपूर शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या दरदिवशी वाढत आहे, मात्र भीमा नदीवर पंढरपूर जवळ सध्या एकच नवीन पूल आहे, आणि टेम्भूर्णी मार्गावर असलेला अहिल्या पूल ४५ वर्षे जुना आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरतो आहे. दरवर्षी भीमा नदीला पूर आला कि हा पूल पाण्याखाली जातो आणि वाहतूक ठप्प होते. शिवाय अहिल्या पूल जुना असल्याने त्यावरून वाहतूक करणे धोकादायक ठरते आहे. आजवर अनेक वाहने या पुलावरून भीमा नदीमध्ये पडलेली आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्या पुलाजवळ आणखी एका समांतर पुलाची गरज होती. आणि आ. समाधान आवताडे यांनी या पुलाची मागणी केली होती. त्या नवीन पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७७ . ७१ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. एन एच ५६१ ए या टेम्भूर्णी - पंढरपूर - मंगळवेढा या मार्गावर हा पूल होणार असून सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ रोजी या पुलाच्या कामास ना. गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.  या पुलाच्या तांत्रिक मान्यतेनंतर २०२७ अखेर पुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. 

आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहर आणि मतदार संघातील विकासासाठी, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेतला आहे. यामुळेच या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली आहे.  पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात काम करत असताना, विविध भागात अनेक प्रकारच्या विकास कामाचा निधी पोहोचविला आहे. त्याच धर्तीवर आणखी एक नव्याने पूल करण्याची मागणी केली असता. हा  निधी मंजूर करून पंढरपूरकरासाठी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .   आमदार समाधान आवताडे यांनी तरुणांच्या हाताला काम लवकरात लवकर मिळावे यासाठीही एमआयडीसीची लवकर निर्मिती होण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पंढरपूर शहरातील अनेक विकास कामामुळे आमदार समाधान आवताडे यांच्या कामाची मोठी ओळख निर्माण झाली आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !