वाई पोलिसानी केले आवाहन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
श्याम पानेगावकर परिविक्षाधीन पोलीस उप अधिक्षक वाई पोलीस ठाणे, ता. वाई, जि-सातारा सर्व नागरीकांना आवाहन करतो की, निकाली गुन्ह्यातील जप्त दुचाकी २० अशी वाहने हि वाई शहर पोलीस ठाणे आवारात पडुन आहेत. या सर्व वाहनांचा शासन नियमाप्रमाणे लिलाव करणेत येणार आहे. सदरचे वाहनांबाबत अद्याप कोणीही मालकी हक्क सिध्द केलेला नाही.
खाली दिलेल्या यादीतील वाहने हि उपलब्ध माहीतीप्रमाणे कोणाचे असल्यास त्यांनी वाई पोलीस ठाणे, ता. वाई जिल्हा-सातारा, येथे मुळ कागदपत्रांसह हजर राहुन खात्री करुन आपली वाहने १५ दिवसाचे आत घेऊन जावे, त्यानंतर कोणीही खालील निकाली गुन्ह्यातील वाहनांबाबत हक्क दाखवल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही व नमुद वाहनांचा स्क्रैप म्हणुन शासन नियमाप्रमाणे कायदेशीर लिलाव केला जाईल.
तरी संबंधीतांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ वाई पोलीस ठाणे, ता. वाई जि- सातारा येथे हजर रहावे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा