maharashtra day, workers day, shivshahi news,

बार्शीच्या विश्वनाथचा उर्दू शायरी पर्यंतचा प्रवास

विश्वनाथ घाणेगांवकरची "मुशाफिरी " अमेझॉनवर!

vishwnath ghanegavkar, mushafir, urdu shayari, amezon, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, मुंबई 

विश्वनाथ घाणेगांवकर चे 'मुसाफिर' हे उर्दू गझल व शायरीचे पुस्तक दी. 3 जानेवारी 2025 रोजी अमेझॉन वरती प्रकाशित झाले आहे. बार्शीचा मूळ रहिवासी असणारा विश्वनाथ आणि सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले असताना त्याचा उर्दू शायरी सोबत तसा काही फारसा संबंध नव्हता. मात्र मराठी कविता लिहिता लिहिता उर्दू मधील दिग्गज शायर जसे जॉन एलिया, राहत इंदोरी, मुनव्वर राणा, वसीम बरेलवी. यांच्या लिखाणाने भारावून जात कधी लेखणी उर्दू कडे वळायला लागली हे समजलंच नसल्याचे विश्वनाथ ने सांगितले. 

गझल लिखानाच्या काही मात्रा आणि शास्त्र असतं त्याचं शिक्षण त्याने पुण्यातील कै.असिफ सय्यद सर यांच्या कडून घेतले. आणि गझल लेखनाचा प्रयत्न सुरु झाला तो अजूनही सुरु असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान असिफ सय्यद सर यांचे निधन झाल्याने प्रवास अर्धवट राहिला मात्र गझल सोबत नाते तुटले नसल्याचे त्याने सांगितले. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून लिखाण सुरूच होते पण आपलं पुस्तक असावं ही इच्छा काही विश्वनाथची पाठ सोडत नव्हती. याच काळात 'bookLeaf Publications' या प्रकाशन संस्थेची ओळख झाली आणि त्यांच्या माध्यमातून आज विश्वनाथचे 'मुसाफिर' हे पहिले पुस्तक आपल्याला अमेझॉन वरती पाहायला मिळत आहे. 

दरम्यान विश्वनाथने हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले आहे. या पुस्तकामध्ये काही गझल नज्म आणि शायरी चा अंतर्भाव आहे. ज्यामध्ये प्रेम, व्यक्तिमत्व आजूबाजूची परिस्थिती यावर शायरी च्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. यातील लिखाणाची शैली वेगळी वाटते तसेच पूर्णतः मराठी वातावरणात वाढलेल्या मुलाची उर्दू शायरी वाचताना एक वेगळीच मजा येते हे मात्र नक्की. तसे उर्दू ही भाषा त्याच्यासाठी नवीन आहे, आसिफ सय्यद सरांच्या निधनानंतर आसपास कोणी उर्दू भाषेसाठी मार्गदर्शन करणारे नसल्याने  स्वतःच सर्व गोष्टी विश्वनाथने पडताळून पहिल्या आहेत. शायरी आवडल्यास नक्की प्रतिक्रिया कळवा, काही चुकत असल्यास सूचना देखील करा आणि काही खटकल्यास टीका देखील करा असे त्याने सांगितले. त्याचबरोबर विश्वनाथने लिहिलेले आणि दिग्दर्षित केलेले दोन सिनेमे देखील लवकरच प्रदर्शित होत आहेत. मनातील भावना कागदाला समजायला लागल्या की भाषा फक्त माध्यम बनते. मराठी, हिंदी, उर्दू यांच्यासोबतचा हा प्रवास आणि शिक्षण असेच सुरु राहिल असे त्याने यावेळी सांगितले. 

हे पुस्तक मागविण्यासाठी इथे क्लिक करा किंवा अमेझॉन वरती "मुसाफिर/musafir विश्वनाथ घाणेगांवकर" असे type करावे 


अब मुझे अच्छा कहो या फिर बुरा 

हर खुदा के सामने काफिर बुरा

कट गया मैं, बट गया मैं, लूट गया 

फिर भी कहती हो बुरा, जा फिर बुरा

वैसे दिल में हद से ज्यादा प्यार है 

क्या करूँ मैं होता हूँ जाहिर बुरा

बस यही होता है दुनियाँ के सफर में 

सब करो अच्छा मगर आखिर बुरा

             - विश्वनाथ घाणेगांवकर

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !