मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत ट्रक आणि आयशर टेम्पोचा भिषण अपघात
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख )
समृद्धी महामार्गावर मेकर हद्दीमध्ये दिनांक 19जानेवारी रोजी सकाळी 05.30 वा दरम्यान पालघर येथून नागपूरच्या दिशेने जात असलेले आयशर क्रमांक च्या चालकाला झोपेची डुलकी लागल्याने समृद्धी महामार्ग चानैज क्रमांक295.2 नागपूर कॅरीडोअर वर समोरील ट्रक क्रमांकCG-04-MF-6243 ला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये आयशर चालक अमित कुमार यादव हा जागेवरच स्टेरिंग मध्ये अडकून मरण पावला.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस चे, पीएसआय गजानन उज्जैनकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोविंद उबरहंडे, मुकेश जाधव, अमोल हरमकर यांनी तात्काळ घटना स्थळ गाठून आयशरमधील मृतक यांना समृद्धी महामार्गावरील मेहकर येथील QRV टीम चे अजय पाटील, शैलेश मोरे ,पंकज तायडे, यांनी कटरच्या साह्याने पत्रा कापून बाहेर काढले. व तात्काळ समृद्धी महामार्ग ॲम्बुलन्स चे डॉक्टर स्वप्नील सुसर व चालक प्रदीप पडघान यांनी जखमी यांना उपचार केला असता तपासींती डॉक्टरांनी मृत घोषित केले. व मृतक याला मेहकर येथील ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले. व दोन्ही अपघातग्रस्त दोन्ही वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली .पुढील तपास पोलीस स्टेशन मेहेकर करीत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा