maharashtra day, workers day, shivshahi news,

एकसर येथील राजेश शंकर सणस याच्याकडुन देशी बनावटीचे पिस्टल व विदेशी बनावटीचे रिव्हॉलवर अशी दोन शस्त्र हस्तगत

सातारा जिल्हा पोलीस दलाकडुन नोव्हेंबर २०२२ पासुन ते आज अखेर १०९ देशी बनावटीची पिस्टल ०४ वारा बोअर बंदुका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या व ०४ मॅग्झीन जप्त करण्यात आलेल्या आहेत

भर दिवसा कमरेला पिस्तुल लावून फिरत होता इसम

A man carrying pistol and revolver, arrested by police, Wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई गुन्हे शाखा आणि वाई पोलीस यांनी एकसर येथील आरोपी राजेश शंकर सणस यांच्याकडुन १ देशी बनावटीचे पिस्तुल व १ विदेशी बनावटीचे रिव्हॉलवर असा १,२०,००० किमतीचे ०२ शस्त्र हस्तगत केले आहेत. 

वाई पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. १६ रोजी वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्री श्याम पानेगांवकर यांना त्यांच्या खास खबऱ्या मार्फत बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाणे हद्दीमधील मौजे एकसर गावाचे बसस्थानकाचे परिसरात एक संशयित इसम हा विनापरवाना अग्निशस्त्र कमरेला लावुन फिरत आहे. अशी खात्रीलायक बातमी प्राप्त होताच त्यांनी त्यांचे अधिनस्थ गुन्हेप्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज यांना सदर बातमीचे अनुषंगाने सापळा रचुन संशयित इसमास ताब्यात घेण्याच्या सुचना देण्यात आल्या 

प्राप्त बातमीच्या आधारे वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेने एकसर गावामधील बसस्थानक येथे सापळा लावला असता, त्याठिकाणी एक इसम हा संशयितरितीने फिरतांना दिसला त्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी अंमलदार यांना वाजवी संशय आल्याने, त्यास ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेश शंकर सणस सध्या रा एकसर ता. वाई जि सातारा असे असल्याचे सांगितले त्याची तपासपथकातील अंमलदार अधिकारी यांनी अंगझडती घेतली असता त्याचे कमरेचे डावे बाजुस ०१ विदेशी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळाले ते ताब्यात घेऊन त्याची अधिक बारकाईने अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेचे पाठीमागे मध्यभागी पॅन्टमध्ये ०१ देशी बनावटीचे पिस्टल खोचलेले दिसले. सदरची १,२०,०००/-रुपाये किंमतीची दोन्ही अग्निशस्त्रे ताब्यात घेऊन त्यास अग्निशस्त्र जवळ बाळगण्याचा परवाना आहे काय याबाबत विचारणा केली असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यास पुढील तपासकामी अटक करण्यात आलेले आहे. 

सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मागदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्री श्याम पानेगांवकर, तपासपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, परि. पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे पो. हवा अजित जाधव पो.शि नितीन कदम, पो.शि राम कोळी, पो.शि हेमंत शिंदे, पो. शि प्रसाद दुदुस्कर, पो. शि. श्रवण राठोड, पो. शि धिरज नेवसे, पो. शि विशाल शिंदे यांनी केली आहे. मा. पोलीस अधिक्षक साो श्री समीर शेख व मा. अप्पर पोलीस अधिक्षक साो श्रीमती वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज हे करीत आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !