maharashtra day, workers day, shivshahi news,

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात - कारचे मोठे नुकसान

एअर बॅग उघडल्यामुळे प्राणहानी टळली

Car accident on Samruddhi mahamarg, express way, sindkhedraja, Buldhana, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)

समृद्धी महामार्गावर दिनांक 16..1.2025 रोजी सकाळी 07.30 वा. दरम्यान चायल नंबर 326.2 नागपूर कॅरिडोर वर कार क्रमांक MH 12-FY-5901 चे चालक संकर श्रीनिवास रेड्डी वय 23 वर्ष रा अंधेरी ,मुंबई हे मुंबईवरून लग्न समारंभासाठी नागपूरच्या दिशेने जात असताना सदर ठिकाणी कुत्रा आडवा आल्याने चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने कार अक्षरशा मिडीयम लेन कडून साईड बॅरिअरपर्यंत  दोन्ही साईडला धडकली. यामध्ये सर्व प्रवासी यांनी सीट बेल्ट लावेल असल्यामुळे समोरील एअर बॅग उघडल्यामुळे प्राणहानी टळली परंतु कारचे अक्षरशः समोरील एक्सेल सहित दोन्ही चाके तुटून बाजूला झाली व पाठीमागून सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दैव बलतवर म्हणून यामध्ये श्लोक कोळमकर वय 24 वर्ष व पुष्पेन्द्र गुप्ता व 27 वर्ष हे  गंभीर जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब समृद्धी महामार्गावरील रुग्णवाहीकेचे डॉक्टर शरद शेळके व चालक दिगंबर शिंदे यांनी प्रथमोपचार करून सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे भरती केले. व सोबत असलेले मोनाली टोपाल व 28 वर्ष व चालक हे किरकोळ जखमी झाले .तसेच कारचे समृद्धी महामार्गावर इंजिनचे दोन तुकडे होऊन चाके बाजूला तुटून पडल्याने काही काळ वाहतूक हळू प्रमाणात सुरू ठेवून महामार्ग पोलीस चे पीएसआय जितेंद्र राऊत पोलीस हेडकॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे ,विजय आंधळे व महाराष्ट्र सुरक्षा बल  चे  गायकवाड व पवन सुरुशे व स्टॉप यांनी QRV टीम चे श्रीकृष्ण बच्छीरे ,आदित्य गोपाळे, दिगंबर इंगोले, नितीन भिसेन यांच्या मदतीने अपघातग्रस्त कार महामार्गाच्या साईडला घेऊन टोईंग करून सुरक्षित ठिकाणी उभे केले. व वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

विशेष म्हणजे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक एक जानेवारी ते 31 जानेवारी 2025 पर्यंत मा.अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक श्री सुरेश मेकला साहेब यांच्या आदेशाने व यशवंत सोळंके पोलीस अधीक्षक महामार्ग प्रादेशिक विभाग, नागपूर. यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान राबवून महामार्गावर होणाऱ्या अपघाताबद्दल पोस्टर, भिंती पत्रके वाटप करून व इतर जनजागृती कार्यक्रम करण्यात येत आहे. तरी सर्व वाहनधारकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालवावे .असे आवाहन महामार्ग पोलीस चे प्रभारी अधिकारी श्री संदीप इंगळे हे करीत आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !