राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
सिंदखेडराजा येथे आज दिनांक 12 जानेवारी 2025 राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमास राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या नेत्या खासदार मा.सौ.सुप्रियाताई सुळे, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.राजेंद्रजी शिंगणे साहेब, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार तथा उत्कर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थजी खरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, शिवसेना उबाठा चे बुलढाणा जिल्हा प्रमुख प्रा.नरेंद्रजी खेडेकर,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष सौ रोहिणीताई खडसे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महाराष्ट्र प्रदेश सेवा दल काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शैलेशजी बावस्कर,लखोजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, मेकर उबाठा शिवसेनाप्रमुख किशोर गारोळे, माजी नगराध्यक्ष देविदासजी ठाकरे, मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पांडव, युवा नेते संदीपजी गवई,यांच्यासह जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक विविध पक्षाचे मान्यवर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समस्त मान्यवरांनी राजवाडा मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मस्थळी अभिवादन करून त्यांचे दर्शन घेतले, तसेच यावेळी शिवाजी राजे जाधव यांनी सुप्रियाताई सुळे यांचा प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळेस प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना "स्वराज्याचा जिने घडविला विधाता धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता" असे मत व्यक्त करून राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला व आज सर्व स्त्रियांनी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचा आदर्श अंगीकारावा असे आव्हान केले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता व सगळीकडे अतिशय उत्साहीत वातावरण होते.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा