मागील वर्षी वीज पडून कोळेकर कुटुंबाच्या जवळपास ५० ते ६० बकऱ्या पडल्या होत्या मृत्यूमुखी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पसरणी येथील जळीतग्रस्त केळगणे कुटुंबीय यांच्या मदतीला गावा बरोबर तालुक्यातील विविध स्तरातून मदत मिळण्यास सुरुवात झाली आहे. घराला लागलेल्या आगीत आपलं सर्वस्व केळगणे कुटुंबाने गमावले. अतिशय सामान्य जीवन जगणारे हे कुटुंब गावाच्या वरच्या बाजूला रानात एकटेच राहते. आकस्मित लागलेल्या आगीमुळे घरातील धान्य ऐवज कागदपत्र व सर्व वस्तू जळून खाक झाल्या राहिली ती फक्त अंगावरची कपडे. रवींद्र केळगणे यांना दोन मुली आहेत आग लागल्यावेळी मुली शाळेमध्ये होत्या.शाळेतून घरी आल्यावर ती विदारक परिस्थिती बघितली होती.
आपली सर्व पुस्तके जळाल्याचे दुःख त्या मुलींच्या अश्रूंमध्ये दिसत होते. ही सर्व भयानक परिस्थिती बघितल्यावर पसरणी गावातील अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आहे आणि त्यानंतर मदतीसाठी आपण सर्व स्तरातून प्रयत्न करायचे असा निर्धार पसरणी गावातील ग्रामस्थांनी केला. मागील चार दिवसांमध्ये समाजाच्या विविध स्तरातून मदत मिळण्यास सुरुवात झाली.प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा महसूल विभागाने या कुटुंबाला चांगली मदत केली. आता जळालेले घरटं पुन्हा उभा राहिले पाहिजे यासाठी गावातील अनेक तरुण प्रयत्न करत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने युवा नेते स्वप्निल भाई गायकवाड हे प्रयत्न करत आहेत.
दोन दिवसापूर्वी गावातील अनेक मंडळींना एकत्र करून त्यांनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली. त्याचबरोबर मदतीसाठी त्यांनी वाई मधील स्त्री रोग तज्ञ डॉ. अजय पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्याला योग्य प्रतिसाद देत डॉक्टर पाटील हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी या कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत केली व आजही समाजामध्ये माणुसकी जिवंत आहे याचे उदाहरण त्यांच्या कृतीतून दिले. पसरणी मध्ये मागील वर्षी वीज पडून कोळेकर कुटुंबाच्या जवळपास ५० ते ६० बकरी मृत पावली होती.या कुटुंबाला सुद्धा डॉक्टर पाटील यांनी आपल्या स्तरावर मोठी आर्थिक मदत केली होती.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टर पाटील यांच्या कार्याबद्दल गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. डॉक्टर पाटील यांच्याबरोबरच स्वप्निल भाई गायकवाड, उपसरपंच बद्रीनाथ महांगडे, अमोल आबा महांगडे,संजय आप्पा कांबळे प्राध्यापक सतीश तावरे मंडल अधिकारी बेलोशे, संपत बापू महागडे, संतोष पवार यांनी या कुटुंबाला १२०००/- आर्थिक मदत केली.
या सर्व प्रक्रियेसाठी माजी उपसरपंच विशाल शिर्के, विलास आबा महांगडे, अजित गायकवाड, गणेश महांगडे, गणेश शिर्के,गणेश काकडे, हवालदार केळगणे,मांढरे,राऊत, वैद्यकीय स्टाफ अक्षय केंद्रे, अक्षय जगताप, युवराज मांढरे,अमीर मुलानी, राजेंद्र खरात, पत्रकार प्रशांत थोरवे यांनी सहकार्य केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा