अंगणातून गेलेल्या विद्युत वायरांच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली आग
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मिलिंदकुमार लांडगे)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या वडोद बाजार गावात मध्यरात्री कापड दुकानासह वाहानाला आग लागून लाखो रूपयांचा नुकसान झाले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की वडोद बाजार येथील रहिवासी काळू लक्ष्मण म्हस्के हे त्यांच्या छोटा हत्ती लोडिंग वाहन क्रमांक MH 20 DE 1903 या वाहनातून तालुक्यातील आनेक गावाचे आठवडी बाजारात जाऊन कापडदुकान लावतात, नियमित पणे काळु म्हस्के यांनी 29 जानेवारी बुधवार रोजी रात्री त्यांनी छोटा हत्ती गाडी कपड्यांच्या गठ्ठ्यासह घरासमोर अंगणात उभी करून रात्री अकरा वाजेदरम्यान झोपी गेले असता
मध्यरात्री एक ते दोन वाजेच्या सुमारास कापडाचे गठ्ठे ठेवलेल्या वाहानाला मोठ्या प्रमाणात आग लागली व या आगीमुळे धडधड आवाज येत असल्याने ते जागे झाले, व त्यांनी आरडाओरड करून नागरिकांना गोळा केले.
शेजारी पाजारी व इतर सर्वांनी मिळून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने चार लाख रुपये किमतीचे छोटा हत्ती लोडिंग वाहन व त्याच्यात ठेवलेले सात आठ लाख रुपये किमतीचे कापड जळून राख झाले.
या घटनेमुळे काळू लक्ष्मण म्हस्के यांचे एकूण बारा लाख रुपयांचे नुकसान झाले, सदरील आग हि अंगणातून गेलेल्या विद्युत वायरांच्या शॉर्ट सर्किट मुळे लागली असावी असे काळू म्हस्के यांनी सांगितले तरी या घटनेची दखल घेत शासनाने या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा