पती पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
समृद्धी महामार्गावर दिनांक 20 जानेवारी 25, रोजी सायंकाळी 5.20 चानैज न.276.9 दरम्यानकार एस क्रॉस क्रमांक MH.27.BV.1800 चालक-नामे मनोज जैस्वाल वय 52 वर्ष त्यांची पत्नी नामे अंजना मनोज जयस्वाल वय 50 वर्ष त्यांचा मुलगा प्रथमेश जयस्वाल वय 23 वर्ष सर्व राहणार अमरावती हे तुळजापूर वरून अमरावती कडे जात असताना गाडी समोर माकड आडवे आल्याने गाडीचा नियंत्रण सुटल्याने सदर गाडी ही क्रॅश बॅरियर ला धडकून अपघात झाला बाबत माहिती मिळाल्याने तात्काळ महामार्ग पोलीस चे पीएसआय जितेंद्र राऊत, पोलीस अमलदार रोशन शेख, इमरान शेख ,हरिओम काकडे, दानिश देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी रवाना होऊन सदर अपघातात जखमी झालेले मनोज जैस्वाल यांच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना पुढील उपचार कामी समृद्धी महामार्ग ॲम्बुलन्स चे डॉक्टर अशोक पिसे, चालक प्रदीप पडघान यांनी पुढील उपचार कामी मेहकर येथील हॉस्पिटल ला ऍडमिट केले . कशाला क्यू आर व्ही टीम मेहकर यांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सदर अपघाताबाबत पोलीस स्टेशन मेहकर पुढील तपास करीत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा