बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी जाहीर
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी आरिफ शेख)
पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद संलग्नित बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या सिंदखेड राजा तालुका कार्याध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार भगवान साळवे यांची निवड करण्यात आली आहे.
मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रणजित राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर बैठक पार पडली. यामधे कार्याध्यक्ष भगवान साळवे तालुका अध्यक्ष, गजानन मेहेत्रे, तर सचिव म्हणून बुद्ध चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी यावेळी शिवाजी मामलकर जिल्हा सचिव, केंद्रीय सदस्य रविंद्र फुलांने, जिल्हा निमंत्रक रामदास कहाळे यांच्यासह राहुल झोटे, एकनाथ म्हस्के, वसीम शेख, आदी पत्रकार उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष रणजित राजपूत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाही मध्ये सर्व पत्रकाराना समान न्याय या पद्धतीने जिल्हा पत्रकार संघात सन्मान केल्या जाईल त्याचा बरोबर पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असल्याच्या भावना रणजित राजपूत यांनी व्यक्त केल्या. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन मेहेत्रे, कार्याध्यक्ष भगवान साळवे, तर सचिव म्हणून बुद्ध चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा