साठ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
अनवडी ता. वाई गावचे हद्दीत पुणे ते सातारा जाणारे हायवे रोडवरील हौसाई पेट्रोल पंप ते सह्याद्री हॉटेल सर्विस रोडवर एस टी बस नंबर MH.11.BL.9407 ही सह्याद्री हॉटेल बाजू कडून उभी होती. मोटरसायकल स्वार कृष्ण उर्फ किसन यशवंत शिंदे वय 60 राहणार अनवडी ता. वाई घरी जात असताना उभ्या असलेल्या बसला समोरून डाव्या बाजूस धडक दिली किसन शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना तात्काळ सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी 19 जानेवारी रोजी रात्री 8.10 च्या सुमारास घडली. घटनेचा अधिक तपास भुईंज पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे , तपासी अधिकारी टकले दादा, अमलदार ननावरे हे करीत आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा