पत्रकार दिनाच्या औचित्याने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, पुणे (प्रतिनिधी आशिष जाधव)
शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांना निर्भीड पत्रकार पुरस्कार मिळाला आहे. शिरूर येथील उन्नती संस्थेच्या वतीने देण्यात येणारा पुणे जिल्ह्यातील हा एक मानाचा पुरस्कार आहे.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ ६जानेवारी पत्रकार दिन साजरा केला जातो. शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय निर्भीड पत्रकार पुरस्कार दिले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत त्यांनी केलेले निरपेक्ष काम, तसेच वेळोवेळी सामाजिक प्रश्नांना शिवशाही न्यूज च्या माध्यमातून त्यांनी वाचा फोडली आणि पाठपुरावा केला. या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण यांना जाहीर करण्यात आला होता.
6 जानेवारी 2025 रोजी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा निर्भीड पत्रकार पुरस्कार फैजल पठाण यांना शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
फैजल पठाण यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिरूर आणि परिसरातील समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. शिवशाही न्यूजचे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी यांनी देखील प्रतिनिधी फैजल पठाण यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा