maharashtra day, workers day, shivshahi news,

पाचगणीच्या हॉटेल हिराबाग या विभत्स डान्स बार वर पाचगणी पोलीसांचा छापा

कारवाईत  20 जणांवर गुन्हा दाखल

Police raid on dance bar, pannchganni, bhilar, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

भिलार पांचगणी सारख्या जागतीक पर्यटन ठिकाणी गायिकांच्या व महिला वेटरच्या नावाखाली बारबाला महिला आणून त्यांना संगिताच्या तालावर उत्तान कपडयात विभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेल्यांवर समिर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा, मा. वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक साो, सातारा व उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. भालचिम साो वाई विभाग वाई यांनी कडक कारवाई करणेबाबत निर्देश दिलेप्रमाणे सपोनि दिलीप पवार पांचगणी पोलीस ठाणे यांनी मंगळवार दि. 7 रोजी त्यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत  त्यांचेकडील खास पथकामार्फत पांचगणी भिलार कासवंड, पाचगणी येथील हॉटेल हिराबाग हॉटेलचे हॉलमध्ये गायीकांच्या व महीला वेटरच्या नावाखाली हॉटेल मालक यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहुन 12 महीला आणुन त्यांना बारबाला या संगिताचे तालावर उत्तान कपडयात बिभत्स हावभाव करुन अंगविक्षेप करुन नृत्य करीत असलेबाबत समजल्याने सपोनि दिलीप पवार पांचगणी पोलीस ठाणे व सोबत पोलीस उप निरीक्षक बालाजी सोनुने, स.फौ रविंद्र कदम, पो.हव. श्रीकांत कांबळे, पो. हवा. कैलास रसाळ,पो. हवा. विनोद पवार, पो.हवा. सचिन बोराटे, पोलीस नाईक तानाजी शिंदे , पो.काँ. उमेश लोखंडे , पो.काँ. सुमित मोहिते  म.पो.हे.काँ. रेखा तांबे  हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी  रवाना झाले. 

रात्रौ पांचगणी भिलार कासवंड, पाचगणी येथील हॉटेल हिराबाग (बिलीव्ह) चे हॉलमध्ये छापा टाकला असता सदर हॉटेलच्या हॉलमध्ये जावुन पाहीले असता 12 बारबाला आळीपाळीने येवुन उत्तान कपडयात तेथे सुमारे 20 गि-हाईकांच्या समोर उभ्या राहुन विभत्स हावभाव करुन गि-हाईकांच्या जवळ जावुन त्यांचे शी लगट करीत असल्याचे दिसले. सदर बारबालाच्या या कृत्यावर गि-हाईक इसम आनंद घेवुन त्यांचे सोबत नृत्य करीत होते. त्यावेळी आम्हा पोलीसांनी छापा टाकला असता 20 जणांना ताब्यात घेतले त्यामध्ये हॉटेल मालक यांचेसह इतर 20 लोकांवर गुन्हा दाखल करणेत आला असुन सदर ठिकाणाहुन साऊंड सिस्टीम, माईक, मोबाईल व कार असा एकुण 25,45,500/- रू किंमतीचे साहीत्य जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहे. घडलेल्या प्रकाराबाबत भा.न्या.सं. कलम 296, 223 महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानकक्ष (बाररुम) मधिल अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व महीलांचे प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनीयम 2016 चे कलम 3, 8 महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम 75 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सो, सातारा,मा. समीर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक सो, सातारा,वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई मा. बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप  पवार पांचगणी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !