गुन्ह्यातून नाव वगळणे व नातेवाईकांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी मागितली होती दहा लाख रुपयांची लाच
शिवशाही वृत्तसेवा, मंगळवेढा (प्रतिनिधी राज सारवडे)
दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचारी अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात सापडले असून पोलीस हवालदार महेश कोळी व पोलीस शिपाई वैभव घायाळ यांना पाच लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे.
याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार तक्रारदार इसम आणि त्याच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल होणार होता. या गुन्ह्यातून तक्रारदाराचे नाव वगळावे तसेच नातेवाईकांना अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार बक्कल नंबर ९०५ महेश राचप्पा कोळी, वय ४३ वर्षे, व पोलीस शिपाई बक्कल नंबर ६२४ वैभव रामचंद घायाळ, वय-३२ वर्षे, यांनी गुन्हयातील रिकव्हरीच्या नावाखाली दहा लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली होती.
पाच लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
या तक्रारीच्या आधारे दिनांक २५ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी आरोपी वैभव रामचंद घायाळ, यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कमेतील पहिला हप्ता म्हणून ५,००,००० रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
दोन्ही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
त्या अनुषंगाने आरोपी महेश राचप्पा कोळी, वय ४३ वर्षे, पो.ह/९०५ रा.निंबर्गी कंदलगाव रोड, सिध्दारूढ मठाच्या मागील शेतामध्ये ता. दक्षिण सोलापूर जि. सोलापूर व आरोपी वैभव रामचंद घायाळ, वय-३२ वर्ष, पो.शि./६२४, रा. गोपाळपूर शिवाजीनगर, सुर्यवंशी किराणा दुकानाजवळ ता. पंढरपूर जि. सोलापूर, यांचेविरुध्द मंगळवेढा पोलीस स्टेशन जि. सोलापूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली सापळा रचून कारवाई
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस उप आयुक्त तथा अपर पोलीस अधीक्षक शितल जानवे-खराडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक उमेश पाटील, पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर, प्रितम चौगुले, अजित पाटील यांनी केली आहे.
लाचलुचपत विभागाचे नागरिकांना आवाहन
लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यासपोलीस उप अधिक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,बदाम चौक, सांगली,कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२३३/२३७३०९५,हेल्प लाईन क्रमांक १०६४,व्हॉट्सॲप मोबाईल नंबर ९५५२५३९८८९ किंवामोबाईल ॲप www.acbmaharashtra.netफेसबुक पेज www.facebook.com-maharashtraACBवेबसाईट www.achmaharashtra.gov.in संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा