श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास तिरंगी फुलांची सजावट, दर्शन रांगेत भारत माता की जय
७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयन रम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केलेली विद्युत रोषणाई व फुलांची सजावटीने भाविक दर्शनरांगेत अधिक गर्दी करीत आहेत. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, या जयघोषा बरोबर भारत माता की जय, अशा घोषणा दर्शनरांगेत सुरू आहेत.
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा