क्रेनच्या साह्याने हार घालून जेसीबीने पुष्पवृष्टी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा प्रतिनिधी शुभम कोदे
कॅबिनेट मंत्री ना.जयकुमार गोरे यांचे पाचवड येथे आगमन झाले .यावेळी बैल गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते घोषणा देत, डीजे, क्रेनच्या साह्याने हार घालून जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी मंत्री महोदय जयकुमार गोरेंचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी जयकुमार गोरे यांच्या गाडयांचा ताफा सातारच्या दिशेने रवाना झाला.
ना.जयकुमार गोरे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो यांनी जो विचारा माझ्यावर टाकलेला आहे तो नक्कीच सार्थ ठरवणार आहे. जिल्हात चार मंत्री पदे मिळाली आहेत. त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढली आहे. यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न असलेले माण, खटाव, चा दुष्काळ हटवण्यासाठी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही नकीच प्रयत्न करणार आहे. सर्व मतदारांनी अगदी मतदानाच्या अगोदर पासून जिल्ह्यात मंत्री पदासाठी चंग बांधला होता आणि आज तो सत्यात उतरला आहे. त्यामुळे मी जिल्ह्यासाठी तरी कधीही कमी पडणार नाही असा विश्वास यावेळी दिला.
यावेळी भुईंज, पाचवड वाई, बावधन,भागातील कार्यकर्ते माजी आमदार मदन भोसले,दिपक ननावरे, अजित जायकर, सुरज कदम, तेजस मांढरे, प्रथमेश फरांदे, संतोषशेठ शिंदे अशोक गायकवाड,मधुकर शिंदे भुईंजचे सरपंच विजय वेळे , पाचवडचे सरपंच महेश गायकवाड, जीवन मोरे,अर्चना मोरे , अविनाश फरांदे, सुरेश कोरडे, हेमंत भोसले, सयाजी दगडे ,, आनंदराव गायकवाड, डॉ.ससाणे यांच्यासह कार्यकर्ते स्वागताला उपस्थित होते. पाचवड येथे ना.जयकुमार गोरे यांचे दिपक ननावरे व माजी आमदार मदन भोसले यांनी जल्लोषी स्वागत केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा