कार्यकर्त्यांकडुन जंगी स्वागताची तयारी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार ना.मकरंद पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याने मतदार संघात कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्यानंतर बुधवार दि. 25 रोजी प्रथमच जिल्ह्यात येत असुन कार्यकर्त्यांमार्फत नामदार मकरंद पाटील यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यातील मतदारांनी मकरंद पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत त्यांना तब्ब्ल 61 हजार मताधिक्याने निवडुण आणलेले होते. सलग 15 वर्षे आमदारकीचा अनुभव असलेले व सर्वसामान्यांच्या हृदयातील आपला वाटणारा माणुस म्हणून आमदार मकरंद पाटील यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विश्वास टाकत मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री म्हणून आपल्या मंत्रीमंडळात मकरंद पाटील यांना स्थान दिलेले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात बुधवार दि. 25 डिसेंबर रोजी प्रथमच आगमन होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झालेले आहे.
शिंदेवाडी येथे सकाळी 9 वाजता आगमन होणार असुन तेथे स्वागत केले जाईल. नंतर स. 9.15 वा. शिरवळ, 9.50 वा. नायगांव, 10.30 वा. खंडाळा, 11.00 वा. वेळे, 11.30 वा. सुरूर, 11.45 वा. कवठे, दुपारी 12.05 वा. बोपेगांव, 12.30 वा. जोशीविहिर, 12.45 वा. भुईंज, 1.15 वा. पाचवड, 1.45 वा. उडतरे, 2.00 वा. विरमाडे, 2.15 वा. मर्दै फाटा, 2.30 वा. लिंब फाटा, 2.50 वा. सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथे, 3.50 वा. नागठाणे, सायं. 4.10 वा. काशिळ, 4.30 वा. उंब्रज, 5.00 वा. कराड शहरात आगमन तर सायं. 5.30 वा. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर आगमन व अभिवादन करणार असल्याची माहिती दिलेली आहे.
महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कॅबिनेट मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या स्वागतासाठी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा