अति दुर्मिळ वन्यजीव तस्करी करुन विक्रीचा प्रयत्न होता
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सुरुर गावच्या हद्दीत श्रीकांत वीर यांचे पडीक जमिनीजवळील सेवा रस्त्यावर संशयित इसम दिपक श्रीरंग मोहिते (वय-४४ वर्षे, रा. वहागांव, ता. वाई) याने बेकायदा, अवैधरित्या, विनापरवाना स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता खवले मांजर विक्री करण्यासाठी आणले होते. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, व सातारा अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, यांनी सातारा जिल्हयात बेकायदेशीरपणे वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या इसमांची माहिती प्राप्त करून, त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांना दिलेल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पोलीस निरीक्षक, अरुण देवकर, यांना खास खबऱ्या मार्फत दिपक श्रीरंग मोहिते, (रा. वहागांव ता. वाई जि. सातारा) याने अतिदुर्मीळ वन्यप्राणी खवले मांजर हे तस्करी करण्याचे उद्देशाने स्वतःचे ताब्यात ठेवून घेतले आहे अशी बातमी प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक, अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे यांच्या पथकास त्या ठिकाणी जावून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शनिवार दि. २८ रोजी पोलीस उप निरीक्षक, विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखालील पथकाने मिळाले बातमीच्या ठिकाणी सुरूर ता. वाई येथे जावून मिळाले बातमीतील इसमास राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक ४८ चे सहीस रोडवर मिळाले बातमीतील त्या इसमास ताब्यात घेतले असता त्याचेकडील गुलाबी रंगाचे पॉलीथीनचे पोत्यामध्ये दुर्मीळ प्राणी खचले मांजर मिळून आले. त्याच्याकडे अधिक विचारपुस करता त्याने ते वहागांव ता. वाई गावचे हद्दीतील डोंगरामध्ये पकडुन त्याची विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार वनपाल भुईज यांना बोलावून घेवुन खवले मांजराबाबत समक्ष माहिती घेतली असता त्यांनी ते खवले मांजर हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे शेडचूल १ मधील असल्याचे सांगितले. त्यानुसार दिपक श्रीरंग मोहिते, वय ४४ वर्षे, रा. वहागांव ता. वाई जि. सातारा त्यांच्या विरुध्द भुईंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा वन्यजिय संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, व सातारा अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक, सुधीर पाटील, रोहित फाणें, पोलीस उप-निरीक्षक, विश्वास शिंगाडे पोलीस अंमलदार अतिष घाडगे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, सचिन ससाणे, प्रवीण पवार, दलजित जगदाळे तसेच वनविभागातील यनपाल दिलीप व्हनमाने, वर्षाराणी चौरे यांनी सदरची कारवाई केलेली आहे. कारवाईमधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा डॉ. वैशाली कडुकर, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा