विद्यार्थ्यांनी उपकरणासह नोंदविला उत्स्फूर्त सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
महात्मा फुले सिंदखेडराजा येथे 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे 30 डिसेंबर व 31 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. सोमवारी विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन प्रा. डॉ. संजय खडसे साहेब, (उपविभागीय अधिकारी सिं.राजा) यांनी केले.
याप्रसंगी मुकेश माहोर (गटविकास अधिकारी पं. स. सिं.राजा), भास्करराव वाघमारे (गटशिक्षणाधिकारी सिं. राजा), भागोजी पुंजाजी तायडे (अध्यक्ष महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था, सिं. राजा), . त्र्यंबकराव म्हातारजी ठाकरे (सचिव महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्था सिं.राजा), मुख्याध्यापक ठाकरे , विज्ञान संघटनेचे दिलीप काकडे, दीपक नागरे, तसेच . संतोष सोनुने , भानुदास लव्हाळे , नंदकिशोर शिंगणे , माधवराव देशमुख , अरुण खेडेकर, श्रीधर जायभाये, विनोद ठाकरे, तायडे , प्रवीण गवई , पद्माकर गवई , महात्मा फुले विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद तसेच तालुक्यातील सर्व विज्ञान शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या उपकरणासह उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तसेच याप्रसंगी नवसाक्षर भारत अंतर्गत उल्हास ॲपचे प्रदर्शन भरवण्यात आले.आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा