गावोगावी होणार जंगी स्वागत आणि मिरवणूक
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
माण - खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे सोमवार दिनांक 23 रोजी सातारा जिल्यात आगमन होणार असून या निमित्ताने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
सोमवारी सकाळी आठ वाजता ते पुणे येथून साताऱ्याकडे प्रस्थान करणार आहेत. सकाळी १० वाजता शिरवळ येथे त्यांचे स्वागत होईल. साडेदहा वाजता ते नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती स्थळास भेट देऊन अभिवादन करणार आहेत. ११ वाजता खंडाळा येथे स्वागत समारंभ होऊन साडेअकरा वाजता कवठे येथे किसन वीर आबा यांच्या स्मृतिस्थळास ते अभिवादन करणार आहेत.
दुपारी बारा वाजता वाढे फाटामार्गे साताऱ्यातील भू विकास बँक चौकात आगमन होऊन पुढे पोवई नाक्यावरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून बॉम्बे रेस्टॉरंटमागें दुपारी एक वाजता
कोरेगाव येथे आगमन व स्वागत, तर दोन वाजता पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधीचे ते दर्शन घेणार आहेत. दुपारी अडीच वाजता पांढरवाडी येथे आणि त्यानंतर महिमानगड येथे आगमन व स्वागत होईल. दुपारी तीन वाजता पिंगळी येथे स्वागत समारंभ होऊन सायंकाळी चार वाजता दहिवडी येथे त्यांच्या स्वागताची रिलायन्स पेट्रोल पंप मार्गे बस स्थानक, फलटण चौक मार्गे सिद्धनाथ मंदिरापर्यंत मिरवणूक निघणार आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा