वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा - शेतकऱ्यांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यातील ओझर्डे येथील सोनेश्वर परिसरात सकाळी सहाच्या सुमारास रानगावचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसापूर्वीच भुईंज परिसरात हा रानगवा आढळून आल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ओझर्डे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे हे शिवारातील कामाच्या व्यापात असलेल्या शेतकऱ्याला अनाहूतपणे भला मोठा रानगवा उभा असल्याचे दिसून आल्याने त्याची सणार दात घाबरगुंडी उडाली त्याने तात्काळ माघार घेत शिवारातील इतर शेतकऱ्यांना ही माहिती दिली. पहाटेच्या सुमारास रानगवा शेत शिवारात आढळला आहे याची वन विभागाने सखोल चौकशी करून तात्काळ ॲक्शन घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्या रानगव्यां पासून जर कोणाला दुखापत झाली तर ह्याला जबाबदार कोण असे स्थानिक शेतकरी यांचे म्हणणे आहे.
सोमेश्वर येथे शिवशंकराचे प्राचीन कालीन मंदिर आहे. मंदिरालगतच कृष्णा नदी वाहत आहे. सोनेश्वर शिवारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. तसेच अनेकांचे गोटे आहेत. वेळप्रसंगी तो शेतकऱ्याच्या अंगावर धावून आला किंवा कोणत्याही शेतकऱ्याला दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल निर्माण होत आहे. रानगवा शेतकऱ्यांच्या पिकांसह इतर पिकांचे हे नुकसान करेपर्यंत शेतकऱ्यांनी वाट बघायची का यासाठी वन विभागाने तात्काळ याचा बंदोबस्त करावा याची मागणी शेतकरी करत आहेत. अद्याप तरी या जंगली रानगव्याने शेती तसेच माणसांना कसली इजा केली नसल्याची माहिती मिळत आहे. नागरिकांनी देखील या रानगव्यापासून दूर राहावे आणि गवे आढळून आल्यास त्यांना त्रास देऊ नये शेतीतील काही पिकांचे नुकसान केल्यास भरपाई संदर्भात वनविभागाकडून पंचनामा करून घ्यावा.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा