निर्भया पथकाकडून विद्यार्थिनींना समुपदेशन व मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते.पालक सभेमध्ये संस्थेचे सेक्रेटरी श्री सुधीर पटवर्धन सर हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सौ संगीता पाटील निर्भया पथकातील पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक विभावरी रेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश रोडगे ,पोलिस नाईक श्री.सागर सावंत ,पोलिस कॉन्स्टेबल श्री अरबाज खाटीक ,श्री.शिवाजी आवटे,महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ जयश्री गायकवाड ,सौ निर्मला वाघमारे ,सौ.माधुरी क्षीरसागर इत्यादी तसेच सखी सावित्री मंचच्या अध्यक्षा सौ सुप्रिया काळे ,माजी विद्यार्थीनी कुमारी स्नेहल आसबे ,पालक प्रतिनीधी श्री शंकर शिंदे इत्यादी लाभले.
सर्व मान्यवरांनी सरस्वती पूजन केले यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता मोहोळकर यांनी सर्वांचे स्वागत करून स्कूल रिपोर्टिंग केले. तसेच अतिथींच्या सत्कारानंतर डॉक्टर सौ संगीता पाटील मॅडम यांनी पालकांना पालकत्व कसे असावे याविषयी मार्गदर्शन व समुपदेशन केले. तर खाटीक सर व श्री रोडगे सर यांनी निर्भया पथक व त्यांची तत्पर मदत याविषयी सांगितले तसेच माता पालकांनाही मार्गदर्शन केले. 95%गुण मिळवून प्रशालेतून सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलेली कुमारी स्नेह असबे ही ने तिच्या यशामागे तिचे पालक तसेच प्रशालेचेही मोठे योगदान असल्याचे सांगितलें. श्री पटवर्धन सरांनी पालकांना त्यांच्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यास सांगितलें. अशा या पालक सभेचे सूत्रसंचालन सौ शिल्पा कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन सौ सायली पोरे तर मीटिंग रिपोर्टिंग सौ वैशाली शिंदे यांनी केले या सभेसाठी सौ मुग्धा चौबे, सौ कल्पना हुच्चे, सौ कविता जगताप ,सौ रोहिणी काळे, सौ निशा जाधव ,सौ हर्षाज्ञी करंडे ,सौ श्रद्धा दुरुगकर, कुमारी मीनाक्षी गायकवाड, श्री क्षितिज मोहोळकर यांचे सहकार्य लाभले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा