maharashtra day, workers day, shivshahi news,

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अमृतमहोत्सवी वर्षाचा बुधवारी सांगता सोहळा समारंभ - बँकेचे अध्यक्ष तथा खासदार नितीनकाका पाटील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांची उपस्थिती 

satara dcc bank, eknath shinde, devendra fadanvis, ajit pawar, nitin patil, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे)

सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, सर्वसामान्यांची बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. १५ ऑगस्ट २०२३ ते १५ ऑगस्ट २०२४ या काळात “गौरवशाली अमृत महोत्सव वर्ष “बँकेने साजरे केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे दोन ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला जाणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीनकाका पाटील यांनी दिली.

सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण, कृषी, सहकारी अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे केंद्रस्थान असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारधारे प्रमाणे बँकिंग सेवेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास व प्रगती साधली आहे.


बुधवार, दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मान्यवरांचे उपस्थितीत आयोजित केला आहे.

या कार्यक्रमास सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मंत्री, आमदार शामराव उर्फ बाळासाहेब पाटील, विद्याधर अनास्कर, खा.श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. राजेंद्र सरकाळे, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, आमदार मकरंद जाधव (पाटील)या प्रमुख मान्यवरांसह बँकेचे सर्व संचालक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमास विकास सोसायटी संचालक, शेतकरी, सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष, खासदार नितीनकाका पाटील यांनी केले आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !