maharashtra day, workers day, shivshahi news,

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा

मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद 

mns, raj thakarey, dilip dhotre, vidhansabha, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत. गाव भेट दौरा गुरुवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील ग्रामदैवत सिताराम महाराज यांचे दर्शन घेऊन सुरू होणार आहे. 

पुढे सायंकाळी ६ वाजता तपकिरी शेटफळ, रात्री ७ वाजता तनाळी, रात्री ८ वाजता तावशी, शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सिद्धेवाडी, सकाळी ९ वाजता शिरगाव, १० वाजता एकलासपुर, सायंकाळी ५ वाजता अनवली, सहा वाजता रांजणी, ७ वाजता मुंढेवाडी ८ वाजता गोपाळपूर, शनिवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता उंबरगाव, सकाळी ९ वाजता बोहाळी, १० वाजता कोर्टी, सायंकाळी ५ वाजता टाकळी, ७ वाजता गादेगाव, रविवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ८ वाजता शिरढोण,९ वाजता कवठाळी, सायंकाळी ६ वाजता वाखरी, सायंकाळी ७ वाजता कासेगाव असा दौरा असणार आहे. यादरम्यान मनसेनेचे दिलीप बापू धोत्रे जनतेशी हितगुज साधून समस्या जाणून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

राज्यातील मनसेचे पहिले उमेदवार म्हणून मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिलीप बापू धोत्रे यांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदार संघातील जनतेशी नाळ जोडली आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांचे मोठे आवाहन असणार आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !