खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असताना आर्थिक देवाण-घेवाण
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
लोणार : (बुलढाणा )
लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या अनेक दिवसापासून सावळा गोंधळ सुरू आहे. शेतकरी व खरेदी विक्री करणाऱ्या धारकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात दलालांमार्फत आर्थिक लूट होत आहे. त्यामुळे हे दुय्यम निबंधक कार्यालय आहे आहे की दलालांचे कार्यालय आहे. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यालयातील संबंधित अधिकारीच यात गुंतल्याने दलाल सैराट झाले असून कार्यालय त्यांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. प्रत्येक खरेदी अथवा विक्रीसाठी त्यांच्या सोबत अधिकाऱ्यांनी पोसलेला दलाल असतोच असे काहीसे चित्र लोणार दुय्यम निंबधक कार्यालयात आहे. येथे लुटीचे आकडे हाजारोतून लाखोकडे पोहचत आहेत. खरेदी-विक्री करणाऱ्या शेतकरी व इतर यांना आपल्या खरेदी व्यवहारासाठी दस्त करणाऱ्या नागरिकांना तासनतास बसण्याची वेळ येत आहे यामुळे मात्र शेतकरी व सर्वसामान्यांना कमालीचा त्रास होत आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या कित्येक दिवसापासून सावळा गोंधळ सुरू आहे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असताना आर्थिक देवाण-घेवाण च्या माध्यमातून हे व्यवहार होत असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे.
लोणार वकील संघाकडून दुय्यम निबंधक कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये एडवोकेट ॲक्ट नुसार दुय्यम निबंधक कार्यालय येथे खरेदी विक्रीचे व इतर सर्व व्यवहार करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे परंतु या निवेदनाला मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई झालेली नाही आपल्या मालमत्ते खरेदी अथवा विक्री करताना दलाला मार्फतच व्यवहार करावे लागतात.नंबर लावण्यासाठी जर एखाद्याला पैसे दिले तर त्या वेळेसच खरेदी-विक्रीचा नंबर लागतो जर दलालामार्फत पैसे दिले नाहीत तर शेतकरी व सर्वसामान्यांना दोन-तीन दिवस नंबर लागण्याची वाट पहावी लागते.
गोरगरीब नागरिक शेतकरी वर्ग कमालीचा हैराणआहे. सध्या सोयाबीन सोगणीचे हंगाम असताना सर्व कामे सोडून लोणार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बसावे लागत आहे. लवकर काम करण्यासाठ दलालामार्फत आर्थिक लूट होत दरम्यान या दुय्यम निबंधक कार्यालय दलालामार्फत व्यवहार केले. जातात या ठिकाणी असलेले कर्मचारी व खाजगी कर्मचारी जाणीवपूर्वक खरेदी विक्रीचे सर्व कागदपत्र दलालाकडे पाठवतात व आर्थिक व्यवहार ठरल्यानंतर त्या व्यक्तीचाच नंबर लावतात गोरगरिबांचे मात्र हाल होत आहेत हा प्रकार थांबवण्यात यावा व एडवोकेट ॲक्ट नुसार या ठिकाणी दस्तऐवजाची व्यवहार करण्यात यावे अशी मागणी लोणार वकील संघाकडून करण्यात आली आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा