शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत मिळवले यश
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये पटकावला जिल्ह्यात दुसरा तर सिंदखेड राजा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्यात जीवन विकास विद्यालय दुसरबीड येथील विज्ञान शिक्षक आदरणीय श्री. दिलीप पंढरीनाथ काकडे सर यांच्या विज्ञान विषयातील शैक्षणिक व्हिडिओला तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
या स्पर्धेत गट १- इयत्ता १ ते २ गट २- इयत्ता ३ ते ५, गट ३ इयत्ता ६ ते ८, गट ४- इयत्ता ९ ते १०, गट ५- इयत्ता ११ ते १२, गट ६- अध्यापक विद्यालय अशा एकूण सहा गटात विषय निहाय स्पर्धा घेण्यात आल्या. यात श्री. दिलीप काकडे सर यांनी 9 ते 10 या गटात विज्ञान विषयातील व्हिडिओ अपलोड करून स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यांच्या या व्हिडिओला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.
काकडे सर यांचा विज्ञान विषय शिकवण्याचा दांडगा अनुभव असून त्यांना तंत्रज्ञानाची आवड आहे. अनेक वर्षापासून ते विज्ञान शिक्षक संघटनेत काम करत असून आतापर्यंत विज्ञान प्रदर्शनी मध्ये त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा,राज्यस्तरावर अनेकवेळा क्रमांक पटकावले आहे.
त्यांच्या या यशासाठी लोकशिक्षण संस्थेच्यावतीने आज जीवन विकास विद्यालय, दुसरबीड येथे स्वर्गीय विनायकजी गुजर उर्फ अण्णा यांच्या पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. मुकुंदरावजी देशमुख,उपाध्यक्ष श्री. किसनरावजी देशमुख, उपाध्यक्ष श्री.पांडुरंगजी कुटे, सहसचिव श्री.काशिनाथरावजी नागरे संचालक श्री. खुशालरावजी भानुसे, संचालक श्री.गोपाळरावजी देशमुख, माजी प्राचार्य श्री. म्हस्के, श्री. डोंगरे सर, प्राचार्य श्री. भांगे सर, उपप्राचार्य श्री. गायके सर, श्री. जी. एस. देशमुख सर, श्री. दहातोंडे सर, श्री. वाकोडे सर, श्री. जी.ओ. देशमुख सर यांच्या हस्ते श्री. दिलीप काकडे सर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा