आमदार मकरंद पाटील व राज्यसभेचे खासदार नितिन पाटील यांनी शुभेच्छा देऊन केले अभिनंदन
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
ओझर्डे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी डॉ.विकास श.पिसाळ-देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . निवडणूक अध्यासी अधिकारी सौ. अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली रिक्त असलेल्या उपसरपंच पदाकरीता अर्ज सादर करण्याची सूचना देण्यात आली यावेळी डॉ.विकास पिसाळ- देशमुख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला.यावेळी अध्यासी अधिकारी यांनी डॉ.विकास पिसाळ यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले
यावेळी जेष्ठ नेते श्री उदयसिंह पिसाळ, विक्रमसिंह पिसाळ, विजयसिंह पिसाळ, विश्वजीत ह.पिसाळ, सुरेश बजरंग फरांदे, भाऊसाहेब कदम, रामभाऊ पिसाळ आनंदा शेलार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य शेखर फरांदे, अतुल कदम, सत्यजित नेमाडे, हर्षदा फरांदे, सुनंदा शिंदे, सुरेखा क्षीरसागर, सुनीता पवार, रेखा कदम, श्रीमती अनिता जायगुडे सौ.शुभांगी पिसाळ राहुल विक्रमसिंह पिसाळ,अमित पवार, विलास सोनवणे, मंगेश सोनवणे,शुभम फरांदे,वरून पिसाळ,स्वराज पिसाळ, जगदीश पिसाळ, संस्कार पिसाळ, इम्रान शेख पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते ग्रामपंचायत अधिकारी श्री.संजय वर्णेकर यांनी उपसरपंच निवडीचे कामकाज पाहिले. डॉ.विकास पिसाळ यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल आमदार मकरंद पाटील व राज्यसभेचे खासदार नितिन पाटील यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा