डॉ.सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नातवाने प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
तळागाळातील जनसामान्य माणसांना देखील आपल्या सामाजिक बांधिलकीतून आपलंसं करून घेणारे नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील समाज दुःख व्यक्त केला आहे डॉ.सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी देखील नायगाव येथे येऊन स्व.खा वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केल्यानंतर चव्हाण परिवारांचे सांत्वन केले आहे.
पुरोगामी विचाराचे पुरस्कृत असलेले नायगावचे चव्हाण घराणे हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यांनी कधीच गोरगरिबाची साथ सोडली नसल्याने ही जाणीव सचिन भाऊ साठे यांना यापूर्वीच होती स्व.खा.वसंतराव चव्हाण यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त करून नायगाव येथे जनसंपर्क कार्यालयात खा.वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले आणि चव्हाण परिवाराचे यावेळी सांत्वन केले आहे.यावेळी युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण,श्रीकांत पाटील चव्हाण यासह समाजातील शिवा कांबळे मालोजी वाघमारे, गवाळकर,भास्कर वाघमारे,एल.एल.निदानकर,डि.एस.वाघमारे, रवींद्र भालेराव,शंकर गायकवाड,रा.ना.मेटकर, भीमराव बैलके,पंडित वाघमारे,अनिल जुळणे, डॉ.प्रभाकर गायकवाड,अक्षय भाऊ बोयाळ, पूनम भाऊ धमनवाडे, परमेश्वर वाघमारे,विलास झिंजोरे,दिगंबर झुंजारे,चंद्रकांत आईलवार, विनोद भालेराव यासह अदी समाज बांधवांची उपस्थिती होती.तर सचिन भाऊ साठे यांनी रा.ना.मेटकर यांच्या घरी भेट दिल्यानंतर मेटकर परिवारांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा