सोयाबीन, कापूस उत्पादक राहणार मदतीपासून वंचित
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेड राजा (तालूका प्रतिनिधी आरिफ शेख)
तालूकयातील सन २०२३ मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही मदत मिळविण्यासाठी त्यांना प्रतिज्ञापत्राचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मदतीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या ही जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये संयुक्त खातेदार असलेल्या शेतकऱ्यांना स्वतः तहसीलदार समोर हजर राहून प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांची एक एकर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र आहे. त्यांना भुर्दंड सहन करावा लागत आहे त्यामुळे, प्रतिज्ञापत्राची अट रद्द करण्याची मागणी होत आहे
मदत एक हजाराची खर्च दीड हजार
सोयाबीन आणि कापूस उत्पादक असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे सामूहिक क्षेत्र हे एक एकर आहे या एका एकराला शासनाने जाहीर केलेल्या मदतीनुसार एक हजार रुपये मिळणार आहेत दुसरीकडे प्रतिज्ञापत्रासाठी बाँड व इतर खर्च मिळून दीड हजार रुपयांपर्यंत खर्च होणार आहे त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांना है अनुदान परवडणारे नसल्याचे चित्र आहे त्यामुळे, सामूहिक शेती असलेल्या शेतकऱ्यांनी सादर केलेले संमती पत्र स्वीकारावे तसेच ज्या प्रकरणात एकापेक्षा जास्त संमतीपत्र आले असतील त्यांना प्रतिज्ञालेख सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी होत आहे
गेल्यावर्षी सोयाबीन आणि कापूस पिकासाठी भावात फरक म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे या मदतीसाठी लाभार्थीची यादी जाहीर करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांनी कृषी सहायकांकडे संमतीपत्र भरुन दिले आहे
त्यानंतर आता ३ सप्टेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढून संयुक्त खातेदार असलेल्या शेतकऱ्यांपैकी ज्याच्या खात्यावर रक्कम जमा करायची आहे, त्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्याची अट लागू केली आहे. त्यातच इतर खातेदारांनी उपस्थित राहून स्वाक्षरी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा