समृद्धी महामार्गावर ट्रक मधून डिझेल चोरी करणारी टोळी होती सक्रिय
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
समृध्दी महामार्ग नागपुर मुंबई लेनवर येनेज क्रमांक ३१० मांडवा शिवारामध्ये इंडीयन ऑईल पेट्रोल पंपा जवळ १३ सप्टेंबर रोजी एका ट्रक मधून डिझेल चोरी करणारी गँग बीबी पोलिसांनी पकडून ७ लाख ५५ हाजाराचा मुद्दे माल जप्त केला त्या आरोपींना १४ सप्टेंबर रोजी लोणार न्यायलयात उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली
समृद्धि महामार्गावरील मांडवा शिवारातील पेट्रोल पंपजवळ ट्रक क्रएमएच १५इ जो ९५१३ वाहनाचा चालक प्रदिपसिंग जसवंतसिंग मान रा. लासलगाव ता निफाड जि नाशिक हा ट्रक सव्हिस रोडवर लावून आराम करीत असतांना सदर डिझेल चोर गैंग ट्रक मधून डिझेल चोरत असतांना चालक मान यांनी त्यांना हटकताच हटकताच ते ते त्यांचे इटींगा गाडीत बसुन भरधाव वेगाने पळून जात होते.
दरम्यान त्यांची गाडी रोडचे महामार्गाच्या बॅरिगेटला धडकुन त्यांचा अपघात झाला त्याच वेळी बीबी पो स्टे चे पेट्रोलींग वाहन पेट्रोलींग करित असतांना चेकिंग अधिकारी यांना सदर अपघात दिसला.
चालक ज्ञानेश्वर फकिरबा ठोसरे यास उपचारासाठी ग्रामिण रुग्नालय बी बी येथे भरती करुन फरार आरोपींचा शोध सुरु केला असता शुभम दिपक उबरहंडे वय २५ वर्ष रा चिखली, हर्षद ऊर्फ भैय्या पांडुरंग साबळे वय २३ वर्ष रा डौलखेड ता जाफ्राबाद जि जालना संकेत सुनिल बोर्ड रा शेळगाव आटोळ यांना परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेवुन पो स्टे ला आणून हजर केले. पो स्टे ला आरोपीतांना गुन्हयाबाबात विचारपुस केली असता त्यांनी पो स्टे बिबी दाखल १) अपनं १५८/२०२४ कलम ३०३ (२) बि.एन. एस. तसेच २) अपनं १४६/२०२४ कलम ३०३ (२) बि. एन. एस.
नूसार दाखल गुन्ह्याची कबुली दिली. सदर घटनेची फिर्याद प्रदिप सिंग जसवंत सिंग मान यांनी दिली त्यावरुन अपनं १७६/२०२४ कलम २८१,१२५ (ए), ३२४ (४), ३०३ (२), ६२ बि एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्हयात आरोपीनी चोरी करण्याचा प्रयत्न केलेले एकूण साहित्य ७ लाख ५,५०० किमती चा मुददेमाल जप्त केला आहे होता.
१४ सप्टेंबर रोजी त्या चारही आरोपींना लोणार न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यान १५ सप्टेंबर एक दिवसाची पोलिस कोठडी दिली.
घटनेचा पूढील तपास ठाणेदार संदिप पाटील, सफो परमेश्वर शिंदे, चापोहेकों अशोक अंभोरे, मापोको नितीन मापारी, नापोकी अरुण सानपपोकों यशवंत जैवळ पोकों रविंद्र बोरे पोकॉ भारत ढाकणे हे करीत आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा