पोलिस अधिकारी पुढे ठरले आवाहन
नांदेड जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर
14 लाखाचा गुटखा व गाडी सहित 20 लाखांचा मुद्देमाल किनवट शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात स्थानिक पोलिसांनी पकडला होता. परिणामी नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. परंतु गुटखा किंग असलेला सारखणी येथील गुटखा माफियाला जेरबंद करत मुसक्या आवळण्यात मात्र पोलिसांना अपयश आले आहे.परिणामी तोच तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्गात करण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोपी पकडण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु किती दिवसात मुख्य गुटखा माफीयांना पकडणार याकडे आता लक्ष लागून आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर गुटखा पकडला तेव्हा पिकप गाडीचा चालक सहित पकडला, परंतु तो पसार कसा झाला?त्याला भेटण्यास सारखणी येथून लाल मारुती मध्ये आलेला कोण ? सदर ड्रायव्हरने मोबाईल वरून कुणा कुणा सोबत संभाषण केले. ते सर्व मोबाईलचा सीडीआर तपासणी केल्यास खरा गुटखा माफिया पोलिसांच्या हाती लागणार आहे. तो वसीम नावाच्या ड्रायव्हरला मीडियाचा बुरखा घालून पत्रकारितेचा आव आणणाऱ्या गुटखा माफीयांनी स्थानिक पोलिसांची आर्थिक हात मिळवणी करून फरार केला आहे. अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. सदर सारखणीच्या गुटखा किंगने गुटखा भरलेला टेम्पो सोडून देण्यासाठी पोलिसांना चक्क पाच लाखाची ऑफर दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु घटनास्थळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सदर ऑफर नाकारली. परंतु सदर गुटखा भरलेली गाडी पोलीस स्टेशन येथे घेऊन गेल्यानंतर तेथे सारखणीच्या गुटखा माफीयांला पोलिसांशी आर्थिक देवाणघेवाण करत ड्रायव्हरला फरार करण्यात यश आले.
आणि सदर ड्रायव्हरला पळून लावले. आपले बिंग फुटू नये यासाठीच ड्रायव्हरला फरार घोषित करण्यात आले आहे असे आता खात्रीलायक वर्त समोर येऊ लागले आहे. पोलिसांना खुनाचा आरोपी तात्काळ जेरबंद करता येते मग हा तर केवळ गुटखा तस्करी करणाऱ्या पिकप गाडीचा ड्रायव्हर आहे. मग तो कसा मिळत नाही ? ही खूप मोठी शोकांतिका म्हणावे लागेल. परंतु आता सदर तपास यंत्रणा स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांचेकडे असल्यामुळे आता ड्रायव्हर अटकेची शक्यता बळावली आहे.ड्रायव्हर अटक होताच सारखणी येथील मोरख्या, मुख्य गुटखा माफिया हा पोलिसांच्या हाती लागणार हे त्रिवार सत्य असून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी निपक्षपणे तपास वेगाने करावा व गुटखा तस्करीचा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ओढावा जेणेकरून किनवट माहूर तालुक्यातील लागलेली गुटखा तस्करीची कीड संपुष्टात येईल एवढे मात्र खरे..!
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा