maharashtra day, workers day, shivshahi news,

मसाईवाडी तालुका माण येथे तृतीयपंथींचा प्रेम प्रकरणातून खून

म्हसवड पोलिसांनी अवघ्या सहा तासात लावला खुनाचा छडा

Masaiwadi Murder case, satara, police, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे) 

म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील मसाईवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत नागोबा मंदीर ते पानवण जाणारे कच्चा रस्त्याचे लगत असलेल्या विजय सिन्हा यांचे विहीरीत एक अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याचे माहीती डायल ११२ बर फोनकरुन कळवली. सदरचे माहीतीचे आधारे प्रेताबाबत खात्री करणेकरीता पोलीस तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत विहीरीचे पाण्यावर तरंगत असल्याचे दिसुन आले. सदरचे प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने त्यांची व त्यांचे नातेवाईकांची ओळख पटविणे आहवानात्मक होते. सदरचे प्रेत पोलीसांनी विहीरीतुन बाहेर काढले व त्यांचा पंचनामा करतेवेळी मिळालेल्या माहीतीवरुन सदरचे मृत्य व्यक्तीचा गळा आवळुन खुन करुन त्याचे खुन केल्याचा पुरवा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेताचे कमरेस लाईटचे केबलने सुमारे ३० ते ३५ किलो वजनाचा दगड बांधुन विहीरीत टाकल्याचे दिसत होते. 

यावरुन पोलीसांना प्रेताची, प्रेताचे नातेवाईक व आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघड करण्याचे तिन्ही आव्हानाला सामोरे जावे लागत होते. सदर मयताचे हातावर गोंदलेले दिसत असल्याचे दिसत असल्याने पोलीसांनी सदर गोंदलेल्याच्या आधारे मयताचे नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरवात केली. सदरची माहीती इन्स्टाग्राम, व्हाटसअॅप, या सोशल मिडीयावर प्रसारीत केली. त्यावेळी मयताचे नातेवाईक यांचा संपर्क झाला. त्यावेळी सदरचा मयत हा मोटेवाडी ता. माण जि. सातारा येथील तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाय घुटूकडे, वय २५ वर्षे, हा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनतर सदरचा मयत याचा कोणीतरी खुन केला असल्याचा संशय असल्याने पोलीसांनी गोपनिय बातमीदारा मार्फत  व तांत्रिक माहीतीचे आधारे तपासाची चक्रे फिरवली. व आरोपीचा शोध सुरू केला. 

आरोपीचा शोध सुरू असताना मयत तृतीयपंथी राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, वय २५ वर्षे, रा. मोटेवाडी ता. माण जि. सातारा यांचे व संशयीत आरोपी समाधान विलास चव्हाण, रा. दिवड ता. माण जि. सातारा यांचे सोबत प्रेम संबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यावरुन आरोपी समाधान विलास चव्हाण, रा. दिवड ता. माण जि. सातारा हा आपले शेतात काम करत असताना पोलीसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी पोलीसांनी त्यास विश्वासात घेवून तपास केला असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यावेळी पोलीसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपी याने आपले व राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटूकडे यांचे प्रेम संबंध होते व तो आपणांस लग्न कर व मला घरी घेवून चल, असा तगादा लावला होता. म्हणुन मी त्यांचा कायमचा काटा काढायाचे ठरवुन राशी उर्फ राहुल घुटुकडे यांस मसाईवाडी ता. माण जि. सातारा गावचे हद्दीत नागोबा मंदीर ते पानवण जाणारे कच्चा रस्त्याचे लगत असलेल्या विजय सिन्हा यांचे विहीरीजवळ घेवून जावून त्यांचे अंगावरील साडीने त्यांचा गळा आवळून जिवे ठार मारुन त्यांचे प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याकरीता त्यांचे प्रेतास लाईटचे केबलने कमरेस दगडबांधुन विहीरीत टाकुन मोटारसायकलने घरी निघुन आल्याचे गेल्याची कबुली दिली. त्यावेळी त्यांस ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यांतील आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक, सो, सातारा समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी सो, दहिवडी उप विभाग, श्रीमती अश्विनी शेंडगे यांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे गुन्ह्यांचे तपासात वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. सखाराम बिराजदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व पोलीस उपनिरीक्षक, श्री. अनिल वाघमोडे व अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्ह्यांबाबत गोपनिय खबऱ्यामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न केला.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सातारा श्री. समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सोो, सातारा, श्रीमती. वैशाली कडुकर, व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  दहिवडी विभाग,  श्रीमती अश्विनी शेंडगे, यांचे मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्री. सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे, व अमंलदार शशिकांत खाडे, अमर नारनवर, पोपट चव्हाण, रुपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, अनिल वाघमोडे, धिरज कवडे, वसिम मुलाणी, श्रीकांत सुद्रीक यांनी केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंद केले.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !