maharashtra day, workers day, shivshahi news,

मारोतराव कवळे गुरुजीचा नवा चेहरा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा कडून विजयी ठरेल

कवळे गुरूजी हे लोकसभेचे विजयाचे शिल्पकार ठरु शकतात ?

loksabha byelection, bjp, congress, nanded, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)

लवकरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होणार आहे.विधानसभेच्या निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणुक पार पडणार आहे.या होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाला आत्ता उमेदवार निवडी बाबत फेरविचार करावा लागणार असुन गत निवडणुकीत दुधाने पोळलेल्या पक्षाला आता ताकही फुंकुन पिण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात असले तरी यासाठी भाजपाला एक सक्षम पर्यायाची चाहुल लागल्याचे विश्वसनिय सुत्रांकडून माहिती पुढे आली आहे. 

लोकसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदार संघात भाजपाचा दारुण पराभव करत कांग्रेसने मोठ्या मताधिक्याने बाजी मारली. परंतु कै.खा.वसंतराव चव्हाण यांना खासदार म्हणुन निवडुन येउन ३ महिन्याचा कालावधी उलटला व काळाने त्यांच्यावर झडप घातली व त्यांच्या प्रकृतीने दगा दिल्याने त्यांचा स्वर्गवास झाला. यात नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुक होणार असुन यासाठी भाजपाला एक सक्षम उमेदवार नायगाव परिसरातील मारोतराव कवळे गुरूजी असल्याचे भाजपाप्रेमी जाणकाराचे मत आहे.तसेच काँग्रेस पक्षाचे प्रा.रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण आमदार व्हावेत अशी नायगाव परिसरातील नागरिकांची ईच्छा आहे.आणि खासदार नायगाव परिसरातील झाल्यावर दुधात साखर टाकल्यासारखे होईल अशी अपेक्षा नायगाव च्या जनतेची आहे.नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपास सक्षम पर्याय म्हणजे लोकाभिमुख शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजीच होऊ शकतात असे भाजपाच्या एका गोटातुन बोलले जात आहे. कवळे गुरुजी हे नांदेड लोकसभेमधुन भाजपाला विजयश्री खेचुन आणण्यासाठी कवळे गुरूजी यशस्वी ठरु शकतात असे मतदारसंघात सध्या चर्चा चालू आहे. 

नायगांव विधानसभा तसेच नांदेड लोकसभा मतदार संघात गुरुजी यांच्या विकास कार्याच्या चर्चेमुळे कवळे गुरुजी संपुर्ण जिल्ह्यातील मतदार संघात सुपरिचीत झाल्याचे अनेकांचे म्हणने आहे.उमरी तालूक्यातील सिंधी या गावी एका शेतकरी कुटुंबात  जन्माला आलेले मारोतराव कवळे गुरुजी हे कुठलाही धाडसी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी असलेले नेतृत्व आहे. कवळे गुरूजी यांनी जिल्हा परिषदेवर निवडुण येऊन उमरी,धर्माबाद व नायगाव तालुक्यातील अनेक गावात विकासाची कामे केले असून,उमरी बाजार समितीचे उपसभापती,सभापती म्हणूनही काम केलेले आहे.विधानसभा निवडणूक पण लढवली होती.माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित प्रदेश कार्यालयात पक्ष प्रवेश केलेला आहे. 

गेल्या लोकसभेला भाजप पक्षाकडुन एकनिष्ठ काम करत आख्खा जिल्हा पिंजुन काढले होते.विकासात्मक काम करण्याची त्यांची पध्दत जणु काही वेगळीच आहे.स्वच्छ राजकारण सर्वाना सोबत घेऊन जनतेसमोर जाणारे कवळे गुरूजी हे लोकसभेचे विजयाचे शिल्पकार ठरु शकतात असे जनतेतुन चर्चा पुढे येत आहे. मारोतराव कवळे गुरुजी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे  नांदेड जिल्हातील शेतकरी आर्थिक बाजुने सक्षम झाला पाहिजे  उमरी धर्माबाद नायगाव सह जिल्हात सिंचनाची सोय झालीं पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे  दररोज नऊशे मेट्रिक टन ऊस गाळप झाला पाहिजे म्हणून शिंधी येथे गुळपावडर कारखाना काढला, शेतीला जोडव्यवसायाच्या माध्यमातून दुग्धव्यवसाय वाढला पाहिजे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहिला पाहिजे याउद्देशातुन जिल्हातील शेतकऱ्यांना कै.व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थेकडुन गाईम्हैशी वाटप करण्यात आले आहे. 

या भागात ऊसाच्या क्षेत्रांत वाढ झाली म्हणून उमरी तालुक्यातील कुसूमनगर वाघलवाडा साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हा कारखाना कवळे गुरूजीना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी कवळे गुरूजींना कारखाना देऊन टाकला.अजून ऊसाचे क्षेत्रात वाढ झाली.पर्याने आशिया खंडातील मोठा  तिसरा नवीन कै.शंकरराव चव्हाण जागरी गुळपावडर कारखाना उभारणी करुन तिन्ही कारखाने सक्षम चालून ऊस लागवड करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केले आहे.कवळे पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्हात २० शाखा काढुन त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे काम कवळे गुरूजी  करीत आहेत. शाळा,कारखाने,दुधडेअरी,पतसंस्था इत्यादींच्या माध्यमातून जवळपास  ५५०० कर्मचारी  काम करीत आहेत. ऐवढ्यावरच न थांबता ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला जास्तीचा भाव मिळेल यासाठी पुढे भविष्यात  सोयाबीन प्लॅंट, इथेनॉल सारखे प्रोजेक्ट काढण्याचा मानस कवळे गुरूजीचा  आहे.धर्माबाद व नायगाव तालुक्यात एमआयडीसी सारखे उद्योग उभारून येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण, शेतकरी,शेतमजूर आधीना न्याय देतीलच व्यापारपेठ वाढेल.

भागात उद्योग उभारल्याने त्यांचे या धाडसी निर्णयामुळे उमरी तालूक्यासह आसपासच्या परिसरातील असंख्य तरुण कामाला लागले आहेत. शेतकरी बांधवांविषयी अपुलकी असलेला त्यांचे जीवनमान गगणाला गवसणी कसे घालू शकेल असा विचार करीत त्याअनुषंगाने उद्योगांची आखणी करणारा उमदा उद्योगपती अशी कवळे गुरुजींनी जिल्ह्यात ओळख निर्माण केली आहे.असा निष्कलंक शेतकरी,शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार लोकांना न्याय देणारा आणी जिल्हात यामाध्यमातून व्यापारपेठ वाढविणारा असा एकमेव भाजप पक्षाकडुन नवीन चेहरा कवळे गुरूजी सारखा लोकसभेला  उमेदवार मिळाला तर नांदेड जिल्हाची भाजप पक्षाची सीट बहुमताने लागू शकते असे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सहकारातुन समृध्दीकडे कवळे गुरूजी 

 जिल्हात सहकार क्षेत्र कसे चालवायचे हे स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेब,कै.शामराव पाटील कदम, कै.बाबासाहेब देशमुख गोरठेकर,कै. बळवंतराव चव्हाण,गंगाधरराव देशमुख कुंटूरकर,कै.बापू बारडकर ,बाबा पाटील बन्नाळीकर यासह अनेक दिग्गंज नेत्यांनी केलेली कामाचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून मारोतराव कवळे गुरूजी यांनी नांदेड जिल्ह्य़ात कै व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था च्या २० शाखा काढुन ते ओोसक्षम रित्या चालवित आहेत.विशेष म्हणजे  सर्वगुणसंपन्न आणी कुठलेच वेसनाधिन नसलेले हे कवळे गुरूजी भारतीय जनता पक्षाला लोकसभेसाठी  सक्षम उमेदवार आहेत त्यामुळे सर्व सामान्य जनतेतुन कवळे गुरूजीना मागणी आहे.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !