maharashtra day, workers day, shivshahi news,

सोनालीका कंपंनीच्या जुन जॅकपॉट लकी ड्रॉ सोडत समृद्धी ट्रॅक्टर्स, पंढरपूर येथे संपन्न

मंगळवेढ्याचे बिराप्पा माळी रॉयल एनफील्ड बुलेट तर कासेगावचे कृष्णा पडळकर ठरले होंडा शाईन गाडीचे विजेते

Sonalika Samriddhi Tractor, abhijit patil, pandharpur, solapur, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)

समृद्धी ट्रॅक्टर पंढरपूर येथे सोनालीका ट्रॅक्टर कंपंनीच्या जुन जॅकपॉट लकी ड्रॉची सोडत दिनांक २ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. या जुन जॅकपॉट लकी ड्रॉ मध्ये जुन महिन्यामध्ये ट्रॅक्टर खरेदी केलेल्या ग्राहकांनसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला होता. यामध्ये प्रथम बक्षीस 65HP CRDS 4WD ट्रॅक्टर, द्वितीय बक्षीस टाटा पंच कार, तृतीय बक्षीस रॉयल एनफील्ड बुलेट, चौथे बक्षीस होडा शाईन गाडी, पाचवे बक्षीस LED TV, सहावे बक्षीस मोबाइल फोन आणि सातवे बक्षीस रिस्ट वॉच ही लकी ड्रॉ ची सोडत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

यामध्ये समृद्धी ट्रॅक्टर्स, पंढरपूर येथील ग्राहक बिराप्पा माळी रा. मंगळवेढा हे रॉयल एनफील्ड बुलेटचे विजेते ठरले आहेत. त्याच बरोबर कृष्णा पडळकर रा. कासेगाव हे होंडा शाईन गाडीचे विजेते ठरले आहेत आणि श्रीमंत बिराजदार, रा. चिकलगी हे मोबाइल फोनचे विजेते ठरले, त्याच बरोबर तुकाराम सावंत रा. जवळा हे रिस्ट वॉचचे विजेते ठरले.

या सर्वांचे धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मा. श्री. अमर पाटील साहेब यांनी अभिनंदन केले. या येणार्‍या सणासुदी निमित्त “हेवी ड्यूटी धमाका” या नवीन लकी ड्रॉ स्कीमची घोषणा करण्यात आली. ही स्कीम दि. 15 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबर 2024 रोजी ट्रॅक्टर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी देण्यात आली. यामध्ये प्रथम बक्षीस 65HP CRDS 4WD ट्रॅक्टर, द्वितीय बक्षीस टाटा पंच कार, तृतीय बक्षीस 25gm सोन्याचे नाणे, चौथे बक्षीस रॉयल एनफील्ड बुलेट, पाचवे बक्षीस रोटावेटर, सहावे बक्षीस होंडा शाईन गाडी, सातवे बक्षीस वाशिंग मशीन, आठवे बक्षीस LED TV, नऊवे बक्षीस मोबाईल फोन, दहावे बक्षीस ज्यूसर मिक्सर आणि अकरावे बक्षीस रिस्ट वॉच असे एकूण 11,011 भेटवस्तु जिंकण्याची सुवर्ण संधी. याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा घ्यावा असे आवाहन धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी पंढरपूर - मंगळवेढा - सांगोला येथील सर्व शेतकर्‍यांना केले.

यावेळी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के, सोनालिका कंपनीचे टेरिटरी मॅनेजर मा.श्री. ओंकार कोळी, समृद्धी ट्रॅक्टरचे मॅनेजर मा.श्री. सोमनाथ केसकर, सर्व शेतकरी बांधव व समृद्धी ट्रॅक्टर चे सर्व स्टाफ उपस्थिती होता.

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !