भुईंज येथील प्रतिष्ठित व्यापा-यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे)
भुईंज येथे एका दुकानात कामाला असणाऱ्या बौद्ध जातीच्या युवकाला दुकानात कामाचे पैसे मागायला गेल्यानंतर आणखी काम करायला सांगून पाठीमागे जावून त्याला जाती वाचक शिवीगाळ केली काठीने व लाथा बुक्यांनी मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याने कामगाराने भुईंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे . संजय अरुण जाधव वय 28 रा भुईंज असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे .
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी संजय अरुण जाधव हा गेल्या दिड महिन्यापासून धनंजय अंकुश पावशे यांच्या पावशे ट्रेडर्स या दुकानात कामाला आहे . सकाळी ७ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत काम करीत असे . दिनांक तीन रोजी संजय जाधव याने दुकानात जाऊन कामाचे पैसे मागितले असता धनंजय पावशे यांनी संजयला गोडाऊन मध्ये जाऊन तांदूळ निवडायचे काम करण्यास सांगितले.
त्यानंतर धनंजय याने पाठीमागून जाऊन काम करीत असलेल्या संजय यास तू आमच्या दुकाना त चोरी करतोस आणि वरून पैसे मागतोस असे म्हणत लाथा बुक्यांनी व काढीने मारहाण करून " तुम्ही महार मांग असेच आमच्या हाताखाली मारखात रहाणार असे म्हणत मारहाण करीत होता . त्यानंतर संजय याने घडलेला प्रकार घरी सांगितला त्यावेळी घाबरून सर्व गप्प बसले ' काल संजयची बहिण पुनम व्याहळीकर ही भुईंज येथे आल्यानंतर तीला हा प्रकार समजला तेव्हा तिने संजयला घेवून पोलिसांत धनंजय पावशे याच्या विरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला आहे .या घटनेचा अधिक तपास वाईचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम करीत आहेत
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा