माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचे कार्यकर्ता बैठकीत वक्तव्य
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर)
माझ्या राजकीय कारकर्तीत कधीच मी जात धर्म पाहिलो नाही सर्व जाती समावेशक काम केले आहे आणि जी माणसं गोरगरीब होती त्यांना सभापती पर्यंत आपण पोहोचलो या सर्वांच्या ताकदीवरच आगामी काळात नायगाव विधानसभा मतदारसंघ हे मिलन खतगावकर यांच्यासाठी निवडनुक राहणार असून माझा राजकीय वारसा पुढे न्यावा एवढाच माझा यामागे हेतू आहे असे प्रतिपादन माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकर नगर येथील कार्यकर्ता संवाद बैठकीत व्यक्त केले.
आयोजित कार्यकर्ता सवांद बैठकीमध्ये अध्यक्षस्थानी माजी मंत्री माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यासह डॉ .मिनलताई खतगावकर, उपमहापौर सरजीत गिल,मसुद देसाई,श्रीराम पाटील राजूरकर, माधवराव पाटील सुगावकर, संजीव कुलकर्णी, शिवकुमार यसगीकर, मंगल पांडे, बाळासाहेब पाटील प्रताप पाटील जिगळेकर यासह अधिजनाची प्रमुख उपस्थिती होती.
अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षात गेल्यानंतर त्यांना एक मराठवाड्याचा नेता म्हणून कॅबिनेट मंत्री देतील आणि नांदेड जिल्ह्याचा चांगला विकास होईल असे आम्हाला वाटले होते पण भाजपाने त्यांना वेगळे स्थान दिले आहे तेव्हा विकास साध्य कुठलाही होणार नाही असे डॉक्टर मीनल खतगावकर यांनीही व्यक्त केले. यावेळी दत्ता हरी पाटील कावळगावकर गोविंद पाटील सोनटक्के धर्माबाद डॉक्टर रत्नाळीकर भीमराव जेठे बिलोली भावना दासटवार देगलूर संभाजी पाटील शिंदे मांजरम बाळू मुदखेडे सुजलेगावकर गणपतराव पाटील धुपेकर नागनाथ आनंतवाड, शेख गौस रामतीर्थ दिगंबर हजारे मेहताब पठाण खैरगाव मोहित पाटील सुगावकर मारुती पटाईत गंगाधर गायकवाड आनंदराव बिरादार साई पा.घुंगराळा मंगल देसाई यासह आद्यजनाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजु गंधीगुडे यांनी तर आभार संतोष पाटील पूयड यांनी मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा