सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
शिवशाही वृत्तसेवा, सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी आरिफ शेख)
बुलढाणा जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर पुणे महामार्गावर दुसरबीड हे सर्वात मोठे गाव आहे.
गाव रस्त्यावर विशेषता महामार्गावर आल्यामुळे व अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे,यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत, नेहमीच दुसरबीड येथे वाहतुकीची कोंडी बघायला मिळत आहे १० सप्टेंबर रोजी मंगळवार बाजार दिवस असल्यामुळे तसेच गौरी गणपतीचे आगमन होत असल्यामुळे गर्दी झाली होती अनेक मोटरसायकल त्याचबरोबर छोटे-मोठे दुकानदार हे रस्त्यावर आले होते त्यामुळे सकाळी सिंदखेडराजा येथून येणारा ट्रक आणि समोरून येणारा ट्रक त्याचबरोबर समोर असलेली बस यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. मुख्य रस्ता असल्यामुळे सिंदखेडराजा जालना इकडे जाणारे वाहने त्याचबरोबर मेहकर लोणार नागपूरकडे जाणारे वाहने सतत वर्दळ असणारा रस्ता आहे.
लांबच लांब वाहनाच्या रांगा होत्या,यामध्ये पोलिसांचे गाडी सुद्धा अडकली होती ,पोलिसांनी वाहनांमधून सूचना दिल्या परंतु कोणी ऐकायला तयार नव्हते. शेवटी आपली गाडी अडकली म्हणून पोलीस उतरले व वाहतूक सुरळीत केली नाहीतर दिवसभर वाहने अडकली असते,परंतु हाच प्रकार दुपारी सुद्धा बघायला मिळाला.
पाच वाजे दरम्यान परत एकदा दुसरबीड येथे वाहतुकीची कोंडी बघायला मिळाली वाहने जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे पर्यायी रस्ता करण्याची मागणी होत आहे त्याचबरोबर रस्ता मोकळा करावा अशी मागणी सुद्धा व्यक्त होत आहे.
बाजार दिवशी ट्राफिक पोलिसांची नेमणूक करा
दुसरबीड हे गाव रोडवर असल्यामुळे ह्या गावाला आस पास २५ खेडी जोडली असून नेहमीच येथे वर्दळ असते त्या मुळे बाजार दिवशी येथे ट्राफिक जाम होते ट्रोफिक जाम होणार नाही व वाहन धारक याना त्रास होणार नाही यासाठी ट्रॉफीक पोलीसांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा