बदलापूर, कलकत्ता संभाजीनगर घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर भूमिका
शिवशाही वृत्तसेवा, धर्माबाद (तालुका प्रतिनिधी नारायण सोनटक्के)
देशात अनेक वाईट घटना घडत आहेत बदलापूर, कलकत्ता संभाजीनगर येथे घडलेल्या निंदनीय घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रसह कुठेही घडू नये यासाठी संकल्प फौंडेशनचे सचिव शिवराज पाटील गाडीवान व सदस्य अशोकराव पाटील वडजे यांनी पोलीस स्टेशन धर्माबाद व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता धर्माबाद पोलीस स्टेशन येथे बैठक घेतली.
या मध्ये गट विकास अधिकारी तोटेवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध शाळा महाविद्यालय व खाजगी क्लासेस यांचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच काही सुजाण नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांशी निगडित असणाऱ्या बाबीवर प्रामुख्याने चर्चा करून शाळा महाविद्यालय बसस्टॅन्ड येथे विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोर मुले यांची गय केली जाणार नाही असा निर्णय घेण्यात आला.
धर्माबाद तालुका शिक्षणासाठी अग्रेसर असल्याने ग्रामीण भागातील अनेक शालेय व महाविद्यालयीन मुली शिक्षणासाठी दररोज ये-जा करत असतात,. त्यामुळे शाळा व महाविद्यालय, खाजगी कोचिंग क्लासेस सुरु व संपायच्या वेळेत ही टवाळखोर मुले विनाकारण गाडीवर बसून पायी जाणाऱ्या मुलींसमोर शाईन मारणे, हॉर्न वाजवणे, मुलीचे छेड काढने इत्यादी गोष्टी दिसून येतात पण अनेकदा घरी सांगावं तर शिक्षण बंद होईल या, भितीने मुली शांत राहतात पण यापुढे असा प्रकार आढळून आल्यास कुणाची ही गय केल्या जाणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी दिला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा