पाणी फाउंडेशन फळबागांच्या लागवडीकडे वळत आहे
शिवशाही वृतसेवा, वैजापूर तालुका प्रतिनिधी , अनिल सूर्यवंशी
खुलताबाद तालुक्यातील १० गावांमध्ये पाणी फाउंडेशन व सेट्रीज संस्थेच्या मदतीने ४००० फळझाडांचे वाटप तहसीलदार श्री स्वरूप कंकाळ, तालुका कृषी अधिकारी श्री ज्ञानेश्वर तारगे, उमेद अभियानचे श्री सुनील बारबैले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणी फाउंडेशन चे विभागीय समन्वयक श्री प्रल्हाद आरसूळ, मास्टर ट्रेनर श्री पोमणे सर, तालुका समन्वयक श्री ज्ञानेश्वर इधाटे, सेंट्रीज संस्थेचे विवेक वानखेडे, अभिजीत भोकरे, ऋषी कोंडे, मंडळ कृषी अधिकारी श्री इंगळे सर, प्रभाग समन्वयक चौधरी हे उपस्थित होते.
सोबलगाव, गोळेगाव, भडजी,विरमगाव, खांडी पिंपळगाव, इंदापूर,दरेगाव, पाडळी, गदाना या गावातील शेतकऱ्यांनी पाणी फाउंडेशन च्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी होऊन कापूस,सोयाबीन व मका या पिकाचे गट तयार करून खर्च कमी करून उत्पन्न वाढवले आहे.
फळझाडांच्या बाबतीत पाणी फाउंडेशन चे प्रशिक्षण घेतले आहे आता ते फळबागांच्या लागवड कडे वळत आहे.
तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी गावकऱ्यांना सुंदर असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वरी यांनी केले तर आभार मित्तल साळुंखे यांनी मांडले
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा