देवीच्या भंडा-या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
शिवशाही वृतसेवा , सातारा जिल्हा प्रतिनिधी, शुभम कोदे
अवघ्या महाराष्ट्रातील भक्त भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या भुईंज येथील पुरातन कालीन श्री महालक्ष्मी देवी मंदिर येथे २३ ऑगस्ट रोजी शुक्रवारी श्रावणी भंडारा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तशी माहीती श्री महालक्ष्मी देवी ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
दसरा आणि नवरात्रौत्सवात अनन्य साधारण महत्व असलेल्या या मंदिरातील श्री महालक्ष्मी देवीच्या भंडा-या निमित्ताने शुक्रवारी पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे चारपासून श्री महालक्ष्मी मातेस दुग्धाभिषेक, होम हवन, श्री सत्यनारायण महापूजा, आरती,स्वामी समर्थ केंद्र भुईंज तर्फे दुर्गा सप्तशती पठन विविध सुश्राव भजन भक्तीसंगम सुरेल कार्यक्रम किडगावं मंडळांचा भजन सोहळा इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
त्यानंतर सकाळी १२ पासून पुढे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये भक्तिगीतांचा, कार्यक्रम होणार आहे. श्री महालक्ष्मी भंडारा उत्सव कमिटी,श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट,व सर्व गणेशोत्सव मंडळे, सामाजिक संस्था,मोठ्या उत्साहाने हा सोहळा पार पाडतात. सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा व भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी देवस्थान ट्रस्ट,महालक्ष्मी भंडारा उत्सव कमिटी व भुईंज ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा