गावाच्या सर्वांगीण विकासाला येणार वेग
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (जिल्हा प्रतिनिधी शुभम कोदे)
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सातारा यांनी जिल्ह्यातील ग्रामीण व कृषी पर्यटन स्थळे स्थानिक लोकांच्या उद्योगाला व पर्यटनाला चालना देण्यासाठी कृती आराखडा बैठक झाली या बैठकी मध्ये वाई तालुक्यातील निकमवाडी या गावाला कृषी पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला. निकमवाडी हे वाई तालुक्यातील छोटेसे गाव आहे. या गावातील शेतकरी आधुनिक शेती करतात. गावात जाताना शेतामध्ये आकर्षक फुले पाहताना मन मोहून जाते. पुणे हि या फुलांची मुख्य बाजारपेठ आहे. पुणे फुलमार्केटला निकमवाडी गावातून हि सर्व फुले विक्रीसाठी पाठवली जातात. गणपती दसरा दिवाळी या सणासुदीच्या दिवसात तसेच लग्न सराईत निकमवाडी गावातुन पुणे फुल मार्केट मध्ये कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते. निकमवाडी गावाच्या शेतकऱ्यानी पुणे मार्केटमध्ये आपल्या गावची छाप उमटवली आहे.
आता गावाला कृषी पर्यटनाचा दर्जा मिळाल्यामुळे गावात येणाऱ्या पर्यटकांना ही फुले शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहायला मिळणार आहेत. आपल्या गावाला कृषिपर्यटनाचा दर्जा मिळने म्हणजे स्वप्नपूर्तीच झाली आहे. अशी भावना येथील शेतकरी वर्ग व्यक्त करत आहेत. गावाच्या विकासात प्रगतशील शेतकरी धर्मराज देवकर, , संतोष देवकर, संजय भोसले, रमेश भोसले,चंद्रशेखर जाधव, निवास निकम, धीरज भोसले, सतीश शिगटे काशिनाथ भोसले, व ग्रामस्थ या सर्वांचे मोलाचे योगदान आहे. तसेच इको ग्रीन नर्सरी कारखाना रोड भुईंज येथे सर्व प्रकारची फुलाची रोपे पाहण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील असे सुमित जाधव यांनी सांगितले.
पारंपरिक पद्धतीने केल्याजाणाऱ्या शेतीला बगल देत आधुनिक व आदर्श शेती व वेग वेगळ्या प्रकारच्या फुलाच्या बागा पाहान्य साठी निकमवाडी गावला एकदा अवश्य भेट द्या
उपसरपंच सुप्रिया जाधव
कृषिपर्यटना साठी गावात कृषि खात्याच्या मार्गदर्शनाखाली ग्रमपंचायत तसेच शेतकरीवर्ग मिळून पर्यटनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा पुरवल्या जातील. ग्रामपंचायत सदस्य विशाल निकम
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा