शिवसेना भगवा सप्ताह निमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम
शिवशाही वृत्तसेवा, नांदेड (जिल्हा प्रतिनिधी शिवाजी कुंटुरकर)
नांदेड मधील दक्षिण मतदार संघामध्ये शहरी भाग हनुमानपेठ वजीराबाद येथील शिवसेना कार्यालय मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सभासद नोंदणी ची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख दीपक शेडे साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख बंडूभाऊ खेडकर महानगर प्रमुख पप्पू भाऊ जाधव उपजिल्हाप्रमुख वेंकोबा येडे शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख अँड अक्षय वट्टमवार शहरप्रमुख अर्जुन सिंह ठाकुर युवासेना विभागीय सचिव महेश खेडकर तालुका संघटक दिलीप सिंह भागिले किशोर ठाकूर लालचंद भैया यादव युवा सेनेचे बासीद पटेल जावेद कुरेशी बबलू शेख शादुल भाई शेख परवेज भाई शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक युवासेना अल्पसंख्यांक अध्यक्ष अमीर कुरेशी यांनी केले यावेळेस या भागातील नागरिक उपस्थित होते.
शिवसेना भगवा सप्ताह हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला असून यामध्ये शेकडो तरुणाने आपली नोंदणी करून शिवसेना ठाकरे गटांमध्ये शिवबंधन हाती बांधले आहे. शिवसेनेमध्ये दिवसेंदिवस तरुणाचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. सदर झालेल्या कार्यक्रमात तरुणांचा प्रचंड प्रतिसाद पाहून लक्षात येते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा