बोगस व्हीआयपी पासेस प्रकरण भोवले असल्याची चर्चा
शिवशाही वृत्तसेवा, तुळजापूर (प्रतिनिधी गणेश पाटील)
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सोमनाथ माळी यांच्या गैरकारभारामुळे त्यांची तत्काळ उचल बांगडी करण्याबाबत या मागणीसाठी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली होती याच मागणीला यश आले असून सोमनाथ माळी यांची तत्काळीत लातूर येथे बदली झाली आहे.
तहसीलदार माळी यांच्या कार्यकाळात राजकीय पुढार्यांना हाताशी धरून मनमानीपणे व्हीआयपी पासेस चे मोफत वाटप केलं असल्याची शंका अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समिती यांना असल्यामुळे तसेच माळी हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर जवळच असलेल्या गावांमधील असून राजकीय लोकांशी पूर्वीपासून हीच संबंध असल्याचे गैरफायदा ते उचलत आहेत त्यामुळे त्यांची इतर जिल्ह्यांमध्ये बदली करण्यात यावी तसेच तसेच मंदिर संस्थांच्या पदावरून उचल मागणी करून इतर जिल्ह्यात बदली करण्यात यावी मंदिर संस्थानाचा पदभार घेतल्यापासून केलेल्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी केली होती तसेच गणेश पाटील यांनी 18 जुलै रोजी मंदिर संस्थानाच्या बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करून व्हीआयपी पासेस संदर्भात जोरदार मागणी लावून धरली होती.
व्हीआयपी बोगस पास संदर्भात बदली झाली असल्याची चर्चा सुरू असून तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तहसीलदार सोमनाथ माळी यांची तहसीलदार देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी बदली करण्यात आले असून त्यांच्या बदलीची आदेश दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी दहा वाजता आले असून तहसीलदार देवणी जिल्हा लातूर येथील तहसीलदार गजानन शिंदे यांची हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे बदली झाली असून देवणी जिल्हा लातूर येथील नूतन तहसीलदार सोमनाथ माळी असणार आहेत
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा