मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील शिवपुरी मंगल कार्यालय येथे माहे जानेवारी २०२४ मध्ये पार पडलेल्या मंथन -प्रज्ञाशोध /सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा तसेच एम. टी. एस. ओलंपियाड स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्यास वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत, वैजापूरचे शिक्षण विस्ताराधिकारी मनीष जी दिवेकर , शिऊरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे, आघुरचे प्राचार्य सुनील व्यवहारे, शिऊर येथील ज्येष्ठ उद्योजक विजय बनकर, भारतीय सैनिक शिवाजी बारसे, शिऊरचे केंद्रप्रमुख साईनाथ कवार, बाभुळगावचे केंद्रप्रमुख दुशिंग , बळहेगावचे केंद्रप्रमुख तुपे, प्रशासकीय अधिकारी शिऊर येथील व्ही के बोडके, तहसील वैजापूर तहसीलचे कर्मचारी गायकवाड व जालिंदर जाधव , शा. व्य. स. अंचलगावचे प्रभाकर कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संयोजक मल्हारी गोसावी यांनी केले.
मंथन व प्रज्ञाशोध सामान्य स्पर्धा परीक्षेत बसलेल्या १००० विद्यार्थ्यापैकी तसेच एम.टी.एस. ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत २५०० विद्यार्थ्यांपैकी १ ते ७क्रमांक मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
वैजापूरचे तहसीलदार सुनील जी सावंत यांनी परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सहायक पोलीस निरीक्षक शिऊर येथील भरतजी मोरे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केली आपले बालपणीचे अनुभव तसेच स्वतःच्या यशाचे गुपित विद्यार्थ्यांना सांगितले व आयुष्यात कठोर परिश्रम करण्यास सल्ला दिला. शिक्षण विस्तार अधिकारी वैजापूर मनीष जी दिवेकर साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे कौतुक केले सदरील उपक्रम राबविणाऱ्या सर्व शिक्षक वृंदाचे हार्दिक अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत वेळेस सहभागी होण्याचा सल्ला दिला.
शिऊरचे केंद्रप्रमुख एस व्ही कवार सर, बाभुळगावचे केंद्रप्रमुख दुशिंग सर व बळ्हेगावचे केंद्रप्रमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य आयोजक भरत कुमार दांडगे सर यांनी केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भरत कुमार दांडगे सर, गोरखनाथ भागवत सर, डीपी देशमुख सर, नागेश जाधव सर, तेजस्विनी मातकर मॅडम, गोसावी मॅडम, जगताप मॅडम, मुंजेवार सर, मेतेवाड सर, उद्धव ढवळे सर, गवळी सर, सुयोग बोहार्डे सर, दत्तात्रय वरपे सर, चांगदेव गादे सर, संतोष सपकाळ सर, बाबासाहेब जाधव सर, दादासाहेब तुतारे सर, दत्तात्रय जाधव सर, दादासाहेब खैरे सर, अंतरगाव पालक वर्ग यांनी मोलाचे योगदान दिले.
सदरील कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा