maharashtra day, workers day, shivshahi news,

पारनेर मध्ये ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहनिमित्त भव्य मशाल यात्रेचे आयोजन

डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली तालुक्यातील सर्व गावांमध्ये पोहोचणार यात्रा

Shivsena, uddhav balasaheb thakrey, parner, ahmadnagar, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणुक चिन्ह मशाल व पक्षाची विचारधारा प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर पोहचविण्यासाठी पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. पारनेर तालुक्यातही तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली भगवा सप्ताहनिमित्त भव्य मशाल यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेचा शुभारंभ दि . ४ रोजी सकाळी ८ वाजता टाकळी ढोकेश्वर येथून होणार आहे. ही यात्रा दि. ४ ऑगस्ट ते दि. ११ ऑगस्ट या दरम्यान शिवसेना तालुकाप्रमुख श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये व वाड्या वस्त्यांवर जाणार आहे.

 

शिवसेनाप्रमुख दिवंगत  बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने या भगव्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवा सप्ताह निमित्ताने पारनेर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण आणि प्रत्येक गावामध्ये भव्य मशाल यात्रा निघणार असून या माध्यमातून शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व येणाऱ्या विधानसभेला पक्षांचे चिन्ह सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी हा भगवा सप्ताह व मशालयात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली आहे. 

 

डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली या यात्रेमध्ये प्रत्येक गावातील नागरिकांच्या अडीअडचणी शिवसैनिक समजावून घेणार असून त्यावर यात्रा संपल्यानंतर सर्व समस्या सोडविण्यावर शिवसेनेच्या वतीने भर दिला जाणार आहे. तसेच ही यात्रा गावागावामध्ये वाड्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांशी संवाद साधनार आहे, उध्दव ठाकरे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी नागरिकांच्या सूचना व त्यांचे विचार समजावून घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिवसैनिक काम करणार असून याबाबतचा अहवाल पक्ष नेतृत्वाला पोहचविणार असल्याचे डॉ.श्रीकांत पठारे यांनी सांगितले आहे. 

 

या यात्रेमध्ये तालुक्यामधील शिवसैनिक, पक्षाचे सर्व पदाधिकारी व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्वच नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.श्रीकांत पठारे यांनी केले आहे.

---------------------

Happy birthday, chairman Abhijeet Patil, shivshahi news,

----------------------------
----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !